आयुक्तांना निवेदन
नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम त्रुटीमध्ये आलेल्या विद्याथ्याना अद्यापपर्यंत मिळालेली नाही. बहुतांश विद्याथ्याना पहिला हप्ता मिळाला परंतु त्रुटीतील काही विद्याथ्याना एक रूपयाही मिळाला नाही. त्यामुळे विद्याथ्याना शैक्षणिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. येत्या दहा दिवसात ही रक्कम विद्याथ्याना देण्यात यावी, अशी मागणी समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे रिपब्लिक स्टुडंट युनियनचे जिल्हाध्यक्ष संदेश शेळके यांनी निवदेनाद्वारे केली आहे.
आरोग्य तपासणी शिबिर
नांदेड : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्यावतीने लिंक वर्कर स्किम अंतर्गत लिंबगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी काेरोना नियमांचे पालन करण्यात आले. या शिबिराला डीआरपी प्रकाश झिंजाडे, बालाजी ढगे, रत्नमाला पंडित, पद्मिन सावंत, आशा तलवारे, रेखा सूर्यवंशी, सीता आसोरे, आशा दुधमल, सारिका वगंर, ममता ढेकणे आदी उपस्थित होते.