चव्हाण फेसबुकवर
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून नियमितपणे सण-उत्सव शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक पेजचा वापर केला जातो. त्यांनी रक्षाबंधनाचा अनोखा व्हिडीओ अपलोड केला होता.
कल्याणकरांच्या भेटी
श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त छोटेखानी तसेच मतदार संघातील महानुभव पंथी असलेल्या गावांत सदिच्छा भेटी देऊन आमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छा दिल्या.
हंबर्डे यांच्या शुभेच्छा
फेसबुक पेज आणि ट्वीटरच्या माध्यमातून नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी गाेकुळ अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या, तर काही ठिकाणी सदिच्छा भेटही दिली.
धार्मिक कार्यक्रमांना भेट
श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित उमरी तालुक्यातील ढोलउमरी, बिनताळ येथील कार्यक्रमांना आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांनी भेटी दिल्या.
गावभेटीतून गोपाळकाला
कृष्णाष्टमीचे कार्यक्रम आयोजित केलेल्या गावांना आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी भेटी दिल्या. कंधार, लोह्यातील अनेक कार्यक्रमांना त्या उपस्थित होत्या.
श्रावण सोमवारकडे लक्ष
आमदारांकडून धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे प्रमाण वाढले असून श्रावण सोमवारनिमित्त महादेव मंदिर दर्शन आणि कार्यक्रमांना अधिक भेटी दिल्या जात आहेत.
जवळगावकर इनॲक्टिव्ह
हदगावचे आमदार माधवराव जवळगावकर हे सोशल मीडियापासून दूर असल्याचे दिसून येते. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमासंदर्भाने ते सोशल मीडियावर नसतात.
नियमितपणे पोस्ट
आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या सण, उत्सव शुभेच्छा तसेच अभिवादन पोस्ट नियमितपणे असतात. ते स्वत: फेसबुक पेज चालवतात. कार्यकर्त्यांना रिप्लायही करतात.
कार्यकर्ते ॲक्टिव्ह
किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या पेजवर श्रावणासह विविध सणोत्सवाच्या शुभेच्छांच्या जाहिराती पोस्ट केल्या जातात. त्यांचे कार्यकर्ते विविध पेज चालवतात.
सोशल मीडियाकडे दुर्लक्ष
मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचे सोशल मीडियाकडे फारसे लक्ष नसते. परंतु, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल केले जातात.
खासदारही
ट्वीटरवर ॲक्टिव्ह
खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी सोशल मीडियाचा वापर करून सण-उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात त्यांनी श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त एक सुरेख शुभेच्छा संदेश दिला आहे. ज्या कार्यक्रमांना प्रत्यक्षात खासदार चिखलीकर यांना उपस्थित राहता येत नाही, त्या ठिकाणी त्यांची मुलगी जि. प. सदस्या प्रणिता देवरे अथवा मुलगा प्रवीण पाटील हे उपस्थिती दर्शवित आहेत. त्याचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले जातात.