शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

शहरातील ३८६ शाळा मनपात वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 10:52 AM

महापालिका हद्दीत कार्यरत असलेल्या ३८६ शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा विषय थंडबस्त्यात पडला असून याबाबत महापालिकेकडून पाठपुरावा सुरू असला तरीही शासनाकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे.

ठळक मुद्देशाळांना सेवा पुरवण्याचे काम महापालिका करीत असली तरी त्यांच्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेकडे नाही. महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या ३७ तर इतर खाजगी संस्थांच्या ३४९ शाळा कार्यरत आहेत तर महापालिकेच्या केवळ १७ शाळा नांदेड शहरामध्ये आहेत.

नांदेड : महापालिका हद्दीत कार्यरत असलेल्या ३८६ शाळा महापालिकेकडे वर्ग करण्याचा विषय थंडबस्त्यात पडला असून याबाबत महापालिकेकडून पाठपुरावा सुरू असला तरीही शासनाकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्याचवेळी महापालिका हद्दीत असणा-या शाळांना सेवा पुरवण्याचे काम महापालिका करीत असली तरी त्यांच्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेकडे नाही. 

महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या ३७ तर इतर खाजगी संस्थांच्या ३४९ शाळा कार्यरत आहेत तर महापालिकेच्या केवळ १७ शाळा नांदेड शहरामध्ये आहेत. शहरात महापालिकेच्या शाळांमध्ये २ हजार ३४० विद्यार्थीसंख्या आहे तर जिल्हा परिषद आणि इतर खाजगी संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या ही ४ हजार १३९ इतकी आहे. राज्यातील सोलापूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर महापालिका हद्दीतील सर्व शाळा या महापालिकेला जोडलेल्या आहेत. त्याच धर्तीवर नांदेड महापालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी संस्थांच्या सर्व शाळा महापालिकेला जोडण्याचा विषय दोन वर्षांपासून चर्चेला येत आहे. 

३१ डिसेंबर २०१३ नुसार शहरातील सर्व शाळांचे नियंत्रण मनपाकडे असावे, असे अपेक्षित आहे. त्याच धर्तीवर नांदेड महापालिकेनेही शहरातील सर्व शाळांचे व्यवस्थापन महापालिकेकडे सोपवावे, असा प्रस्ताव एक नव्हे, तर दोन वेळा शासनाकडे पाठविला आहे. मात्र शासनाकडून त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. दुसरीकडे महापालिका शिक्षण विभागाकडे मात्र शहरातील मनपा शाळांसह सर्व शाळांची माहिती व इतर सेवाविषयक माहिती शासनाला पाठविण्याची जबाबदारी कायमस्वरूपी आहे. शहरातील सर्व खाजगी शाळांची कामे महापालिकेने करायची व इतर अधिकार मात्र जिल्हा परिषदेकडे आहेत. परिणामी यावर आता शासनस्तरावरुन निर्णय अपेक्षित आहेत. हा निर्णय घेताना नगरविकास विभाग आणि शिक्षण विभागाला एकत्र येवून तोडगा काढावा लागणार आहे. शासनस्तरावरुन असा निर्णय झाल्यास राज्य शासनाला नांदेडमध्ये १३ केंद्रप्रमुख, ८ विस्तार अधिकारी तसेच इतर लिपिकवर्गीय कर्मचा-यांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्याचवेळी महापालिकेलाही या शिक्षकांच्या वेतनाचा निम्मा खर्च उचलावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या ३७ शाळांमध्ये २१८ शिक्षक मनपा हद्दीत आहेत. खाजगी शाळांमधील शिक्षकांची संख्या खूपच अधिक राहणार आहे, हेही निश्चित आहे. 

मनपा शाळांमध्ये शिक्षकांची वाणवामहापालिका हद्दीत असलेल्या १७ शाळांमध्ये ८९ शिक्षकांची पदे मान्य आहेत. मात्र आजघडीला येथील ३२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या दोन आणि १ ते ८वी पर्यंतच्या  १५ शाळा आहेत. विशेष म्हणजे, शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे महापालिकेच्या १७ शाळांपैकी ४ शाळा या केवळ एका शिक्षकावर चालतात, हेही भयाण वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या  एकशिक्षकी असलेल्या शाळामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे एक शिक्षक पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना किती ज्ञानदान करीत असेल? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.