नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी विज्ञानाबद्दल आवड निर्माण होणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे आणि भविष्यामध्ये त्यादृष्टीने आदिवासी विद्यार्थी तयारी करतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून औपचारिक शिक्षण पोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचून लॅबची परिणामकारकता वाढविण्याची अटल टिकरिंग प्रयोगशाळा समुदाय अभियानाचे उद्दिष्ट आहे त्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयातील नव्या संकल्पना रुजविण्यासाठी व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत.
त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक पार्टस, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, थ्री डी प्रिंटर, ड्रोन व्हिडिओ कॉन्फरसिंग रोबोटिक्स किट्स विविध प्रकारचे सेन्सर्स सेफ्टी गॉगल यासह अनेक प्रकारचे साहित्य त्यात उपलब्ध राहणार असून त्याद्वारे प्रयोग करता येणार आहे.
किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण सोळा शासकीय आश्रम शाळा असून अटल टिकरिंग प्रयोगशाळेसाठी प्रकल्पातील किनवट व माहूर तालुक्यातील तुळशी शासकीय आश्रम शाळेना मंजुरी मिळाली आहे.
या दोन्ही शाळेत हॉल बांधून मिळावा यासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती नियोजन अधिकारी शंकर साबरे व शिक्षण विभागाचे साहाय्यक प्रकल्प अधिकारी टेळे यांनी दिली आहे. अटल टिकरिंग लॅबचा किनवट येथील ३०० व तुळशी येथील १५० अशा ४५० विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे