नांदेड : ‘गतिमान शासन- गतिमान प्रशासन’ अशा कितीही बाता मारल्या तरीही प्रत्यक्षात अत्यंत विचित्र अनुभव लोकांना येतो आहे. नांदेड तालुका सहकार उपनिबंधक कार्यालयातील आवक-जावक आणि मुख्य लिपिक यांच्या टेबलमध्ये केवळ १० फुटांचे अंतर आहे. असे असतानाही आवक जावक लिपिकाकडे दिलेला अर्ज मुख्य लिपिकाकडे जाण्यास तब्बल ९ दिवस लागले. त्यामुळे कुठे आहे गतिमान प्रशासन असा सवाल केला जात आहे.
नांदेड हाऊसिंग सोसायटी विजयनगर येथील एका रहिवाशाने ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान, नांदेड तालुका उपनिबंधक कायार्लयातील आवक जावक लिपिकाकडे एक पत्र दिले होते. पत्रात नांदेड हा.सो. विजयनगर ही संस्था असि्तत्वात असल्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली होती. दोन ते तीन दिवसांत प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल, असे संबंधित लिपिक यांनी यावेळी सांगितले. शनिवार, रविवारची सुट्टी असल्याने सदर अर्जदार सोमवारी कायार्लयात पोहोचले व त्यांनी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली, तोपर्यंत आवक-जावक विभागात दिलेले पत्र मुख्य लिपिक एस.एस. देशपांडे यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते. ‘तुमचे पत्र टपालात आले नाही, तुम्ही ३ ते ४ दिवसांनी या’ असे देशपांडे यावेळी अर्जदाराला म्हणाले.
अर्जदाराने होत असलेल्या दिरंगाईबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केली, तेव्हा ‘आम्हाला काय तुमचे एकट्चेच काम आहे काय? दुसरे कामे नाहीत काय? अशा अद्वातद्वाची भाषा यावेळी देशपांडे यांनी वापरली. पुन्हा अर्जदार हे शुक्रवारी दुपारी कार्यालयात गेले आणि त्यांनी प्रमाणपत्र देण्याची विनंती केली, असे असतानाही ह्या टेबलवरुन त्या टेबलवर पत्र तब्बल ९ दिवस उलटूनही पोहोचले नव्हते. अर्जदार समोर उभा असल्याने फायली चाळून अर्ज शोधण्याचा प्रयत्न देशपांडे यांनी केला, आवक- जावक लिपिक यांनाही विचारणा केली, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तुम्ही दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान या, असे फर्मान पुन्हा देशपांडे यांनी सोडले. त्यामुळे अर्जदार बाहेर पडला व त्याने पुन्हा ४.२५ वाजता कार्यालय गाठले असता, अखेर त्यांना पत्र देण्यात आले.
नांदेड तालुका सहकार उपनिबंधक कार्यालयातील प्रकारएकूणच नांदेड तालुका सहकार उपनिबंधक कायार्लयात मोठी अनागोंदी पहावयास मिळाली. उपरोक्त प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन दिरंगाईस जबाबदार संबंधित कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी अर्जदाराने केली असून, लवकरच याकडे जिल्हाधिकारी, सहकार उपनिबंधक यांचेही लक्ष वेधण्यात येणार आहे.n धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य लिपिक एस. एस. देशपांडे यांच्यापर्यंत मागणी अर्ज पोहोचलाच नव्हता. अर्थात आवकजावक लिपिक आणि देशपांडे यांच्या टेबलमधील अंतर १० फुटांपेक्षा कमी आहे.