नायगाव तालुक्यात ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यातून ६०२ ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार आहे. यात सर्वात मोठी असलेल्या नरसी ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या सतरा आहे. एकूण मतदार ७१२१ आहेत. त्यात ३८२६ पुरुष, तर ३२९५ स्त्री मतदार आहेत. या मतदारांना मतदान करण्यासाठी ११ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या क्रमांकावर मांजरम असून, याची ग्रा.पं. सदस्यसंख्या पंधरा आहे. एकूण मतदार ५६२० असून, यात पुरुष ३०११, तर महिला २६०९ आहेत. ५ वाॅर्ड असून, मतदान केंद्रेही पाच आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर बडबडा ग्रामपंचायत असून, त्याची सदस्यसंख्या पंधरा आहे. येथे ५ हजार ३७१ मतदार असून, २८१४ पुरुष, तर २५५७ महिला मतदार आहेत. पाच वाॅर्ड असून, पाच मतदान केंद्रे आहेत. चौथ्या क्रमांकावर कुंटूर ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतची सदस्यसंख्या १३ आहे. ४१८९ मतदार असून, २२०५ पुरुष, तर १९८४ महिला मतदार आहेत. पाच वाॅर्ड असून, पाच मतदान केंद्रे आहेत. मतदारसंख्येनुसार पाचव्या क्रमांकावर कोलंबी असून, येथील ग्रामपंचायत सदस्यसंख्या अकरा असून, ३५५० मतदार आहेत. ज्यात १८९४ पुरुष, तर १६५६ महिला मतदार आहेत.
चार वाॅर्ड असून, चार मतदान केंद्रे आहेत. सहाव्या क्रमांकावर कृष्णूर ग्रामपंचायत असून, येथील सदस्यसंख्या अकरा आहे. या गावांत तीन हजार १७८ मतदार आहेत. यात १६६५ पुरुष, तर १५१३ महिला मतदार आहेत. राहिलेल्या इतर ग्रामपंचायतची मतदारसंख्या वरील संख्येपेक्षा कमी आहे. या निवडणुकीत सर्वात छोटी मेळगाव ग्रामपंचायत असून, सात सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे ३८२ मतदार असून, १६५ पुरुष, तर १८७ महिला मतदार आहेत. तीन वाॅर्ड व तीन मतदान केंद्रे आहेत. यापेक्षा थोडी मोठी निळेगव्हाण ग्रामपंचायत असून, सात सदस्यसंख्या ४८९ मतदार आहेत. यापेक्षा थोडी मोठी टाकळी तब ग्रामपंचायत असून, सात सदस्यसंख्या, तर ४९१ मतदार आहेत. ज्यात २५१ पुरुष, तर २४० महिला आहेत. २३ डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. कार्यालयात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार डी.डी. लोंढे यांनी दिली.