लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावर छापा मारुन पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारखान्यात जाणारे गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात धान्याचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट असल्याचे आढळून आले़ त्यासाठी पोलिसांनी धान्य घेवून जाणाऱ्या वाहनांच्या जीपीएसचा डेटा मिळविला असून त्याद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे़ परंतु, पोलिसांची ही कारवाईच गोत्यात आणण्यासाठी अनेकांनी खलबते सुरु केली आहेत़शासकीय धान्याची वाहतूक करण्यासाठी एका कंपनीला ११५ वाहनांना जीपीएस बसविण्याचे कंत्राट देण्यात आले होते़ परंतु, कंत्राटदाराने त्यापैकी केवळ ६५ वाहनांमध्येच जीपीएस यंत्रणा बसविल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे तीन वाहने धाब्यावर थांबली होती़ ही धान्य वाहतूक करणाºया कंत्राटदाराने दिलेली सबब किती सत्य? याचाही उलगडा होणे सोपे आहे़ ती तीन वाहने धाब्यावर थांबली होती तर इतर सात वाहनांचे काय? ज्या वाहतूक ठेकेदाराकडे धान्य वाहतुकीचे काम आहे़ तो ठेकेदार मुसलमानवाडी येथील धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानापर्यंत एक क्विंटल धान्य नेण्यासाठी फक्त ४ रुपये ५० पैसे दर घेतो़तर शासकीय वाहतुकीचा दर हा जवळपास ७ रुपये प्रतिक्विंटल असल्याची माहिती हाती आली आहे़ त्यामुळे यामध्ये राहणारी तूट वाहतूकदार कशी भरुन काढत होते़ हाही संशोधनाचा विषय आहे़ अशाप्रकारे दर महिन्याला वाहतूक पुरवठाधारकाला १३ लाख रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती हाती आली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी धान्याचा काळा बाजार होत असल्याचे भक्कम पुरावे गोळा केले आहेत़ त्यात जीपीएसचा डेटाही महत्त्वाचा ठरणार आहे़ या डेटाच्या मदतीने धान्य काळा बाजाराची ही साखळी उघडी पडणार आहे़---तपास आता नुरुल हसन यांच्याकडेया प्रकरणात यापूर्वी सपोनि मरे यांच्याकडे तपास होता़ परंतु, या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा तपास आता सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे दिला आहे़ नुरुल हसन हे कडक शिस्तीचे अन् नियमावर बोट ठेवणारे अधिकारी आहेत़ वाळूमाफियांना सळो की पळो करुन सोडणाºया नुरुल हसन यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आल्यामुळे काळा बाजार करणाºया बड्या मंडळीचे धाबे दणाणले आहेत़---पोलीस दबावतंत्र वापरत असल्याचा आरोपकृष्णूर धाड प्रकरणात पोलीस विभागामार्फत वस्तुस्थिती व कार्यपद्धती समजून न घेता चुकीच्या पद्धतीने तसेच पूर्वगृहदूषित पद्धतीने तपास केला जात असून महसूल विभागाच्या कर्मचाºयावर दडपण आणण्याचे काम सुरू असल्याची तक्रार राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात शासननिर्णयाचा अभ्यास करुन तपास करावा. या तपासासाठी पुरवठा प्रशासन सहकार्य करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांकडून असाच पूर्वगृहदूषित तपास सुरू राहिल्यास ५ आॅगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशाराही संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मुंडे, विजय चव्हाण,श्रीकांत गायकवाड, सुरेखा नांदे, संतोषी देवकुळे, मुगाजी काकडे, उत्तम निलावाड आदींनी दिला आहे़
जीपीएसमुळे होणार धान्य काळा बाजार रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:46 AM
कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावर छापा मारुन पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारखान्यात जाणारे गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात धान्याचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट असल्याचे आढळून आले़ त्यासाठी पोलिसांनी धान्य घेवून जाणाऱ्या वाहनांच्या जीपीएसचा डेटा मिळविला असून त्याद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे़ परंतु, पोलिसांची ही कारवाईच गोत्यात आणण्यासाठी अनेकांनी खलबते सुरु केली आहेत़
ठळक मुद्देतपासात पोलिसांनी गोळा केले धान्य वाहतुकीचे रेकॉर्ड