अर्धापूर ( नांदेड ) : तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी वाईन विक्री संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत शुक्रवारी अन्यत्याग आंदोलन ( दि.११ ) केले. धान्यापासून बनणाऱ्या बिअरमुळे धान्याच्या किंमती वाढल्या नाहीत, तर वाईनमुळे फळाच्या किंमती कशा वाढतील असा सवाल आंदोलकांनी केला.
राज्य सरकारच्या किराणा दुकानावर वाईन विक्रीच्या निर्णयाने सडकून टीका होत आहे. या निर्णयाने तरुण पिढी बरबाद होईल, यामुळे राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होत आहे. या निर्णयाविरोधात तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरूदेव सेवा मंडळचे जिल्हा प्रसारक गजानन योगाजी आबादार यांनी हनुमान मंदिरासमोर अन्यत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनास प्रहार चे तालुकाध्यक्ष छगन पा. सांगोळे, भारतराव आंबोरे, किसन दुकानदार जाधव, बळीराम आबादार, दत्तरामजी इंगोले,सरपंच संभाजी पांचाळ,उपसरपंच उद्धवराव आबादार, ग्रा.स.भगत जाधव,नारायण आबादार,राजू पाटील आबादार यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी पाठिंबा दिला.
वाईन विक्री विरोधात ग्रामपंचायतीचा ठरावराज्य सरकारने वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. यावेळी सरपंच संभाजी पांचाळ,उपसरपंच सुनीताबाई आबादार,वंदनाबाई सांगोळे,पंचफुलाबाई पिंपळे,अम्रपाल वाघमारे, शुभम जाधव, दिगंबर जाधव,सुमनबाई आबादार,प्रियंका वाघमारे,ग्रामसेविका के.पी.जाधव आदींची उपस्थिती होती.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागेआदोलकांची मागणी राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ना.त. सुनील माचेवाड, तलाठी बालाजी माटे यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.
ज्वारी, गव्हाचे भाव वाढले नाही फळांचे वाढणार का?शेतात पिकवलेल्या गव्हापासून ब्रेड, बिस्किट तर बियर ज्वारीपासून बनवली जाते. पण अद्यापही गहू आणि ज्वारीचे भाव वाढले नाहीत. मग वाईन विक्रीच्या निर्णयामुळे फळांचे भाव वाढणार का ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.