शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले

By admin | Published: November 17, 2014 12:05 PM

शासनाच्या योजनांचे थकित ठेवलेले अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजार रुपयांची लाच घेणार्‍या पाथरड येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे.

नांदेड : शासनाच्या योजनांचे थकित ठेवलेले अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजार रुपयांची लाच घेणार्‍या पाथरड येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे.मुदखेड तालुक्यातील पाथरड (रेल्वेस्टेशन) येथील ग्रामपंचायतीमध्ये सुनील रामराव पारडे हे ग्रामसेवक आहेत. त्यांनी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत स्वच्छालयाचे मंजूर झालेले अनुदान एक वर्षापासून थकित ठेवले होते. याबाबत लाभार्थ्यांनी पाठपुरावा केला असता सात लाभार्थ्यांना त्यांनी प्रत्येकी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु सध्या ग्रामसेवक पारडे हे पिंपळकौठा येथे कर्तव्यावर होते. याबाबत लाभार्थ्यांनी १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. १६ नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील राज कॉर्नर येथे तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ग्रामसेवक पारडे यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपतचे पोलिस अधीक्षक शिरिष देशपांडे, पोलिस उपअधीक्षक एम.जी.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. अशोक देशमुख, व्यंकट शिंदे, शेख चाँद, वामन कोकाटे, अनिल कदम यांनी सापळा कार्यवाहीत सहभाग नोंदविला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक एम.जी.पठाण करीत आहेत. /(प्रतिनिधी)