नांदेड : गटशिक्षणाधिकारी प्रा. प्रदीप सुकाळे यांना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पोटा बु.च्या वतीने सेवानिवृत्तीनिमित्ताने निरोप दिला. अध्यक्षस्थानी पोटा केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापिका सुनीता संगेवार, तर माजी गटशिक्षणाधिकारी रमेश संगपवाड, सरपंच राजू जाधव, मारोती जाधव, अरुण पाटील, दीपक कुलकर्णी, बालाजी राठोड, केंद्रप्रमुख एम. डी. शेख, दत्तात्रय धात्रक, गणेश कोकुलवार, संजय जान्ते, केंद्रीय मुख्याध्यापक नामदेव राठोड, पुरुषोत्तम ठाकूर, पत्रकार पांडुरंग मिरासे, आनंदराव जळपते, पत्रकार गऊळक यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय जान्ते यांनी प्रास्ताविक केले; तर नारायण गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शंकर गच्चे यांनी सूत्रसंचालन केले; तर सुधाकर गायकवाड यांनी आभार मानले.
ऑल इंडिया पॅंथर सेना
नांदेड : महाराष्ट्रातील वाढत्या जातीय अत्याचारांविरोधात तसेच पदोन्नतीतील आरक्षणाच्या हक्कासाठी सामाजिक न्याय विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण फुगारे यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील सोनकांबळे, विजय शेरे, संघम वाघमारे, अजय लोणे, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बचट गटांना कर्जवाटप
नांदेड : नांदेड जिल्हा स्वयंसाहाय्यता गटांची सहकारी पतसंस्था असलेल्या यशश्रीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डाॅ. पी. डी. जोशी-पाटोदेकर यांच्या हस्ते विविध उद्योग करण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यात आले. यावेळी विविध गटांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते. तसेच वंदना खिराडे, अर्चना पारळकर, बालाजी आलेवार, संगीता कांबळे, आकाश मोरे यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक एम. एम. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
कृषी दिन साजरा
नांदेड : हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त नांदेड चाईल्ड लाईन कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी डाॅ. पी. डी. जोशी होते. दरम्यान, केंद्र समन्वयक बालाजी आलेवार यांनी मार्गदर्शन केले. संगीता कांबळे यांनी सूत्रसंचालन, तर आशा सूर्यवंशी यांनी आभार मानले.
पुस्तकाचे प्रकाशन
नांदेड : कै. प्रा. सुग्राम पुल्ले यांच्या 'मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ इंजिनिअर द. मा. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रा. डॉ. जगदीश कदम, प्रा. विलास वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत ज्ञानेश्वर व कै. प्रा. पुल्ले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रा. कमलाकर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले; तर प्रकाशक दत्ता डांगे यांनी आपली भूमिका मांडली. यानंतर प्रा. जगदीश कदम यांच्या हस्ते 'मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. शिवसांब कापसे यांनी सूत्रसंचालन केले; तर प्रा. जितेंद्र पुल्ले यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजयकुमार बेंबडे, डॉ. संजीव रेड्डी, मुंडे, अनंत भुर्कापल्ले, संजय येरमे, शकुंतला पुल्ले, मंजुळा भुर्कापल्ले, मनीषा पुल्ले, अर्पिता जितेंद्र पुल्ले, नागनाथ अक्क्नगिरे, लिंगराम हंडरगुळे, आदी उपस्थित होते.