परिणामी २२ मार्च २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ज्या पद्धतीने माहूर तालुका प्रशासनाने कामगिरी बजावली होती, त्या तुलनेत यावर्षी मात्र तालुका प्रशासन गांभीर्याने घेत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच की काय तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून, शेजारच्या यवतमाळ, विदर्भ सीमेवर कॅम्प लावून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अन्टिजेन टेस्ट घेण्यास सुरुवात केल्यानंतर आज रोजी कोरोना बाधितांची संख्या २८ वर पोहोचली आहे. माहूर शहरातील बंद झालेले समाजकल्याण विभाग वसतिगृहाच्या इमारतीमधील कोविड केअर सेंटर दि. ११ मार्च २०२१ पासून नव्याने सुरू करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये अद्याप एकही रुग्ण भरती नसून, २८ बाधित रुग्ण होमक्वारंटाइन आहेत.
कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी माहूर तालुका प्रशासन सज्ज असून, प्रत्येक गावात ग्रा. पं. मार्फत व माहूर शहरात नागरिकांना सोशल डिस्टन्सचे पालन करीत, नियमावलींचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकाव्दारे व विविध माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु नागरिकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा आपल्या तालुक्यातील जनतेचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी जनतेनेही कोरोनाविरुद्धची लढाई लोकचळवळ आहे, या भावनेने प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. साहेबराव भिसे,
तालुका आरोग्य अधिकारी, माहूर
फोटो :
- नीतेश बनसोडे, माहूर