केंद्र शासन, पंजाब शासन, हरयाणा शासन, दिल्ली शासन, मध्यप्रदेश शासन आणि देशातील प्रमुख संस्थातर्फे गुरू तेगबहादूर यांचा प्रकाशपर्व भव्य स्वरूपात साजरा करण्याविषयी काही महिन्यांपूर्वी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेले आहेत. याचा विचार करता दक्षिण भारतीय शिखांची सर्वांत मोठी प्रातिनिधिक आणि धार्मिक संस्था म्हणून नाववलौकिक गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेने याविषयी पुढाकार घ्यावा. गुरुद्वारा बोर्डाने स्थानिक शीख समाज, औरंगाबाद, हैदराबाद, बीदर भागातील शीख समाजाचा समावेश करून चार ते पाच महिन्यांची व्यापक प्रचार मोहीम राबवावी. स्थानिक पातळीवर कार्यसमितीचे गठण करून वरील विषयाच्या गाढ्या अभ्यासकांना आमंत्रण देऊन त्यांच्या सेवा घेण्यात याव्यात, तसेच गुरू तेगबहादूर यांच्या इतिहास आणि जीवनकार्याविषयी शोधकार्य करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा नांदेड येथे पाचारित करण्यात यावे, अशी मागणी या निमित्ताने केली आहे.
गुरू तेगबहादूर यांचा ४०० वा प्रकाशपर्व भव्य स्वरूपात साजरा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:17 AM