लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़या केंद्राचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुरीचे बीज जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़ ज्या वाणाला जास्त उतार आला ते वाण पुढच्या वर्षी शेतक-यांनी वापरावे यासाठी मार्गदर्शन केले जाते़ हा हेतू या केंद्राचा आहे़परंतु आजघडीला या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही? याचा प्रश्न शेतक-यांना पडतो़दरवर्षी या जमिनीत लागवड केलेल्या पिकाची माहिती व झालेल्या उत्पन्नाची माहिती देणे बंधनकारक आहे़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बीज गुणन केंद्राची शेती ही शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञ अधिका-यांच्या देखरेखीखाली केली जाते़ त्यामुळे येथील पिकांना येणारा उतारा जास्त असायला पाहिजे़ सतत पेरणीपासून काढणीपर्यंत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी शिबीर घेणे महत्त्वाचे आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून तसे शिबीर येथे झाले नाही़पेरणीकाळात जिल्ह्याच्या बीजगुणन केंद्रातून अल्पभूधारक, मागासवर्गीय शेतकºयांना अर्ध्या किमतीमध्ये तूर, ज्वारी, उडीद, मूग यांच्या बॅगा दिल्या जातात़ परंतु दरवर्षी ठरलेली मंडळीच याचा लाभ घेताना दिसतातक़ेंद्राच्या आजूबाजूला तीस-पस्तीस खेडी आहेत़ तेथील प्रत्येक शेतक-यांना या केंद्राची माहिती असायला पाहिजे. मात्र ती नाही़ बोटावर मोजण्याएवढीच शेतकºयांची येथे ऊठबस असते़ परंतु, सामान्य शेतकºयांना या केंद्राची माहिती देवून त्याचा फायदा पोहोचविण्याचे काम कर्मचा-यांनी करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत़२़३६ हेक्टर परिसरात इमारत उभीया केंद्राचा फायदा शेतकºयांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकाचे बीज या जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही, याचा प्रश्न शेतकºयांना पडतो़
हदगाव तालुका बीजगुणन केंद्र नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:48 AM
मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़
ठळक मुद्देकेंद्र सुरू की बंद हेच शेतकऱ्यांना कळेना!