नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर पाऊस झाला काही ठिकाणी पावसाचा जोर होता, काही ठिकाणी नव्हता. पावसासह वादळी वाºयाने मुदखेड तालुक्यात केळीची बाग आडवी झाली. हदगाव तालुक्यात चारा, वैरण, गोठ्यावरील पत्रे, ताडपत्रे उडाल्याने शेतकऱ्यांची दैना झाली.मनाठा, तामसा मंडळातवादळी वारा, पाऊसहदगाव: तालुक्यात शुक्रवारी अचानक सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली़ अर्धा तास धुंवाधार पाऊस झाला़ सखल भागात पाणी साचले़ तर शेतामध्ये चरीभरून पाणी वाहिले़ यामुळे शेतकरी सुखावला़ पण चारा, वैरण, गोठे यावरील पत्रे, ताडपत्रे उडाल्याने त्याची दैना झाली़ गतवर्षी ३ ते १० जूनपर्यंत संपूर्ण तालुक्यात पेरणी झाली होती़ गतवर्षी आॅगस्ट, सप्टेंबरपासून पावसाने डोळे वटारले होते़ त्यामुळे रबी पिकासह पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता़ यावर्षी तापमान प्रचंड वाढल्यामुळे पावसाळा मोठा व वेळेवर होईल असा अंदाज शेतकºयासह हवामान खात्यानेही पूर्वी वर्तविला होता़ परंतु चक्री वादळामुळे मान्सून येण्यास विलंब झाला़मुदखेड तालुक्यातही हजेरीमुदखेड : शुक्रवारी सायंकाळी मुदखेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पेरणीसाठी जोरदार पावसाची गरज आहे.बारुळ, कौठा परिसरातमध्यम स्वरुपाचा पाऊसबारुळ/कौठा : कंधार तालुक्यातील बारुळ, कौठा परिसरात मध्यमस्वौपाचा पाऊस झाला. कौठ्यात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने नेहमीप्रमाणे वीज खंडित झाली. पावसामुळे वातावरणात बदल झाला़नरसी, कुंटूरमध्ये पाऊसनरसीफाटा/ कुंटूर : नरसी येथे जवळपास १ तास पाऊस झाला. पावसाने शेतकºयांच्या चेहºयावर हास्य फुलवले, काही जणांच्या मते अजून जोरदार पावसाची गरज आहे. कुंटूर येथेही पावसाने हजेरी लावली.उमरी तालुक्यातही हजेरीउमरी : तालुक्यात सायंकाळी ५.३० च्या दरम्यान पावसाने सर्वदूर हजेरी लावली. पावसामुळे रस्ते काही प्रमाणात का होईना भीजले होते.पावसाने शेतकºयांना मिळाला दिलासापार्डी : अर्धापूर शहर, परिसरात शुक्रवारी सायंकाळी मोसणीपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून तापमाणात मोठी घट झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने वातावरण थंड झाले़ शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे़एक दोन दिवसात मोठा पाऊस झाला तर खरिपाच्या पेरणीला सुरुवात होईल, असे शेतकºयांत चर्चा होऊ लागली. पेरणीसाठी लागणाºया साहित्याची जुळवाजुळव करून ठेवली.बी-बियाणे खाते खरेदी करून ठेवली. मोठ्या पावसामुळे जमिनीतील उष्णता कमी होऊन जमिनीत ओलावा तयार झाल्यास खरीप पेरणीसाठी पोषक वातावरण राहील या करिता शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे़पेरणी योग्य पाऊस होताच शेतकरी खरीप पेरणीला सुरुवात होईल खरीप पेरणीसाठी शेतकरी हातात तिफन घेऊन सज्ज आहे़वादळी वाºयाने केळीबागेला फटकाबारड : शिवारातील शेतकरी दीपक देशमुख यांच्या गठ नंबर ५१७मध्ये केळीबाग होती. जोराच्या वाºयाने केळीबागेचे नुकसान झाले. शेतकरी केळीबाग जोपासना करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो उत्पन्न निघण्या साठी या केळी बागावरती मशागत, लागवड, खते, फवारण्या यासाठी लाखो रुपयाचा खर्च करून केळी बाग जोपासतो़ मात्र निसर्गासमोर कुणाचेही चालत नाही, असे म्हणण्याची वेळ संबंधितांवर आली.
हदगाव, मुदखेड, नायगाव, उमरीत पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:10 AM
नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर पाऊस झाला काही ठिकाणी पावसाचा जोर होता, काही ठिकाणी नव्हता. पावसासह वादळी वाºयाने मुदखेड ...
ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात पाऊस वादळी वाऱ्याने केळीची बाग आडवीचारा, वैरण, गोठ्यावरील पत्रे, ताडपत्रीही उडाली