लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पाच कि़मी़ लांब अंतरावरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठी मोफत सायकली दिल्या जात होत्या़ आता या योजनेचा संबंधित विभागाला विसर पडलेला दिसतो़ पाच वर्षांपासून तालुक्यात एकही सायकल मुलींना मिळाली नाही़एक मुलगी शाळा शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते, असे म्हणतात़ ‘अडाणी आई घर वाया जाई’ असा नाराही याच मुलींच्या तोंडून गावागावांत १५ आॅगस्ट व २६ जानेवारीला ऐकायला मिळतो़ परंतु या मुलींना शाळेत पाठविताना काय काय अडचणी असतात, याचा धसका पालकांनाच माहीत असतो़ ज्या गावांत शाळा आहेत, तेथील मुली शिकतात़ परंतु, अनेक गावांना पाचवीपर्यंत शाळा असतात़ पुढील शिक्षणासाठी त्यांना लगतच्या मोठ्या गावात जावे लागते़ कुठे वाहनाची सोय असते तर कुठे नसते़ एकूण १९६ शाळांपैकी १५ ते २० गावांत १० वी, १२ वी पर्यंत शाळा आहेत़ उर्वरित १७० गावांतील विद्यार्थी सोयीनुसार आजूबाजूच्या गावात शिक्षण घेतात़रस्त्यावरील गावे सोडली तर १०० गावांतील विद्यार्थ्यांना बससेवाही नाही़ विद्यार्थिनींना मोफत पास आहे. परंतु, गावातून बसच नाही़ तर पासचे करायचे काय? खाजगी वाहनांत कोंबडे कोंबल्याप्रमाणे मुली प्रवास करताना शिक्षक, पालक पाहतात़ वरवट, गायतोंड, जगापूर, शिबदरा, माळझरा, कार्ला, मनाठा, सावरगाव येथील विद्यार्थिनींना मनाठा पाटीला जावे लागते़ वरवट-गायतोंड येथील मुली मात्र पायीच येतात़---पायीशिवाय पर्याय नाहीवाकीच्या मुली आठ कि़मी़ पायी येतात़ तरोडा, चोरंबा, ठाकरवाडी येथील मुलींना पायी चालण्याशिवाय पर्याय नाही़ गावात रिक्षा नसेल तरी त्यांच्या वेळेत तो येत नाही.रिक्षाला जादा भाडेरिक्षाला जादा भाडे देवून जावे लागते़ या मुलींना महिला बालकल्याण विभागाकडून सायकल उपलब्ध करून दिल्यास त्यांची शाळेची वाट सुखकर होईल़--हदगाव तालुक्यात सहा जि. प. गटअंबाळा, हडसणी, हारडप, ल्याहरी, वरवट, मनाठा, गायतोंड, माळझरा, मार्लेगाव, उंचाडा, करमोडी याशिवाय तामसा परिसरातील तळेगाव, पाथरड, शिवपुरी, रावणगाव, उमरी, वडगाव यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल़ तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट आहेत.
हदगाव तालुक्यात शालेय विद्यार्थिनी सायकलींपासून कोसो दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:51 AM
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पाच कि़मी़ लांब अंतरावरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठी मोफत सायकली दिल्या जात होत्या़ आता या योजनेचा संबंधित विभागाला विसर पडलेला दिसतो़ पाच वर्षांपासून तालुक्यात एकही सायकल मुलींना मिळाली नाही़
ठळक मुद्देमहिला, बालकल्याण विभागाला विसर ; ५ वर्षांपासून एकाही सायकलीचे वितरण नाही