अर्धापूर : शासनाने प्रतिबंधित केलेल्या कॅरीबॅगच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे़ अर्धापूर शहरातून ४ लाख ४२ हजार ३५० रुपयांच्या ४ हजार ४२५ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत़राज्य शासनाने कॅरीबॅगवर बंदी घातल्यानंतर राज्यभरात कॅरीबॅग विक्रेते आणि व्यापाऱ्यांवर छाप्यांना सुरुवात झाली होती़ सुरुवातीच्या काळात प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे कॅरीबॅग विक्रेत्यांचे धाबेही दणाणले होते़ परंतु मध्यंतरी कॅरीबॅगच्या विरोधातील ही कारवाई थंड पडल्याचे दिसून येत होते़ त्यात शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अर्धापूर शहरात एका घरावर छापा मारून ४ हजार ४२५ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत़ आरोग्य निरीक्षक मदन दापकेकर, कर निरीक्षक सुहास गायकवाड, लिपिक परवेज हुसेनी, कैलास गायकवाड या नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली़पोलीस अधीक्षक संजय जाधव, पो़नि़ सुनील निकाळजे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी़डी़ भारती, दशरथ जांभळीकर, शेख जावेद, अफजल पठाण, ब्रह्मानंद लामतुरे, बजरंग बोडखे यांनी ही कारवाई केली़शहरात कॅरीबॅग विरोधातील मोहीम थंडावलीकॅरीबॅग बंदीच्या निर्णयानंतर महापालिकेच्या वतीने जुना मोंढा तसेच शहरातील इतर भागात कॅरीबॅग विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात छापे मारले होते़ या छाप्यांमध्ये लाखो रुपयांच्या कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या होत्या़ एकाच व्यापा-याकडे तीन-तीन वेळेस महापालिकेने छापे मारले होते़ प्रत्येक वेळी दंड ठोठावल्यानंतरही व्यापा-यांकडून कॅरीबॅग विक्री सुरूच होती़ त्यात आता ही मोहीम थंडावल्यामुळे कॅरीबॅग विक्री सुरूच आहे़
अर्धापुरात साडेचार हजार किलो कॅरीबॅग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:49 AM
शासनाने प्रतिबंधित केलेल्या कॅरीबॅगच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे़ अर्धापूर शहरातून ४ लाख ४२ हजार ३५० रुपयांच्या ४ हजार ४२५ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत़
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गुप्त माहितीवरून कारवाई