नांदेड जिल्ह्यात फेसबुक आणि व्हाॅट्स-ॲपच्या माध्यमातून छळाच्या अनेक घटना घडत आहेत. त्यात आरोपी हे ओळखीतले, नातेवाईक अथवा मित्र परिवारातील असल्याचे बहुतांश घटनांत पुढे आले आहे.
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
मुळात स्त्रिया सोशल मीडियाचा फारसा वापर करत नाहीत. ज्या महिला फेसबुक, व्हाॅट्सै-ॲप अशा माध्यमांचा वापर करतात, त्यातील बहुतांश महिला अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद ठेवत नाहीत. परंतु, अनोखळी व्यक्तीकडून होणाऱ्या त्रासाबद्दलदेखील कुणाकडे बोलत नाहीत. त्यामुळे छळ करणारे मोकाट असतात. बदनामीच्या भीतीपोटी महिला तक्रार देत नाहीत.
महिला-मुलींचा कोणत्याही प्रकारचा छळ असो, त्यांना कोणी त्रास देत असेल, तर नेहमीच आम्ही अन्याय-अत्याचाराविरोधात त्यांच्याबरोबरीने उभे राहतो. महिला-मुलींची तक्रारीची पोलिसांनी वेळीच दलख घेणे गरजेचे आहे.
- कल्पना पाटील-डोंगळीकर.
महिलांनी वेळीच तक्रार दाखल करावी...
सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार कोणी त्रास देत असेल, तर महिलांनी याबाबत नजिकच्या ठाण्यात अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार करावी. - सायबर सेल विभाग.
बदनामीपोटी अनेक महिला झालेल्या छळाविषयी बाहेर बोलत नाहीत. परंतु, कुटुंबातील व्यक्तीस विश्वासात घेऊन घटनेबाबत बोलले पाहिजे. तसेच समोरची व्यक्ती वारंवार त्रास देत असेल, तर पोलीस, सामाजिक संघटनांची मदत घेतली पाहिजे.
- काॅ. डाॅ. उज्ज्वला पडलवार
सोशल मीडियावर होणाऱ्या त्रासाबाबत महिलांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
पोलीस अधीक्षक कार्यालयात असणाऱ्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवून त्यांचीदेखील महिला मदत घेऊ शकतात.
पोलीस ठाणे, सायबर सेल यासह अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षाचीही मदत घेऊ शकता.