विशाल सोनटक्के ।नांदेड : जुन्या मोंढ्यातून वजिराबादकडे निघताना भर उन्हातही कॉर्नरला तुडुंब गर्दी दिसून येते. ही गर्दी असते जारचे शुद्ध आणि थंड पाणी पिण्यासाठी. भल्या पहाटे प्रारंभ झालेला हा उपक्रम सायंकाळपर्यंत अविरतपणे सुरू असतो. दिवसभरात अक्षरश: हजारो नागरिक या मोफत उपक्रमाचा लाभ घेतात.मोंढा परिसरातील बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथे खरेदीसाठी केवळ शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्याच्या विविध भागांतून राबता असतो. या भागात खरेदीसाठी फिरणारे अनेकजण घसा कोरडा पडताच मोंढ्याच्या कॉर्नरकडे वळतात. तेथे शुद्ध आणि थंड पाण्यांच्या जारचा ढीगच लागलेला असतो. व्यापारी अब्दुल सलीम कादरी सौदागर हे हा उपक्रम राबवितात. कादरी यांच्या या पाणपोईवर आठ ते दहा मुले कार्यरत असतात. येणाऱ्या- जाणाºया पादचाऱ्यांना ते आवर्जून पाणी हवे का? अशी विचारणाही करतात. पाणपोईवर गेल्यानंतर तितक्याच विनम्रतेने थंड पाण्याचा ग्लास हातात ठेवला जातो. विशेष म्हणजे, येणाºया- जाणाºया नागरिकांनी तेथे आपल्या जवळच्या बाटल्या पाण्याने भरुन मागितल्यास त्या बाटल्याही आवर्जून भरुन दिल्या जातात. कादरी यांचा हा उपक्रम सकाळी सुरू होतो तो दिवस मावळेपर्यंत चालू असतो. या कालावधीत हजारो जणांची तृष्णा भागते.पाण्यासारखे पुण्य नाहीभर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस झालेले नागरिक पाहिल्यानंतर दिवसभर सुरू राहणारी पाणपोई सुरू करण्याचा निर्धार केला.तहानलेल्यांना पाणी देणे यासारखे दुसरे पुण्य नाही,अशी यामागची भावना होती. या उपक्रमाचा दररोज ४० हजारांहून अधिक नागरिक लाभ घेतात. मागील सात-आठ वर्षांपासून ही सेवा सुरू आहे. याचे सर्वस्तरातून कौतुक होत असले तरी प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे अब्दुल सलीम कादरी सौदागर यांनी सांगितले.लागेल तेवढे जार उपलब्धपाणपोई सकाळी सुरू झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी येथे नागरिकांची रीघ लागलेली असते. त्यामुळे दिवसभरात शेकडो पाण्याच्या जारची गरज भासते. अब्दुल कादरी यांनी हे लक्षात घेवून त्याची विशेष व्यवस्था केली आहे. जसजसे जार संपतात तसतसे नव्याने जार आणून उपलब्ध करुन दिले जातात. यासाठी माणसांची नियुक्तीच केली आहे. त्यामुळे दिवसभर येथे पाणी उपलब्ध असते.
हजारोंची तृष्णा भागवितो मोंढ्यातील पाण्याचा झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:42 AM
जुन्या मोंढ्यातून वजिराबादकडे निघताना भर उन्हातही कॉर्नरला तुडुंब गर्दी दिसून येते. ही गर्दी असते जारचे शुद्ध आणि थंड पाणी पिण्यासाठी. भल्या पहाटे प्रारंभ झालेला हा उपक्रम सायंकाळपर्यंत अविरतपणे सुरू असतो. दिवसभरात अक्षरश: हजारो नागरिक या मोफत उपक्रमाचा लाभ घेतात.
ठळक मुद्देअब्दुल सलीम कादरी सौदागर यांचा उपक्रमदररोज हजारो नागरिकांना जारचे पाणी