नांदेड : जिल्ह्यात रविवारी जिल्हा रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरी भागात नागरिकांची तारांबळ उडाली तर बळीराजा सुखावला या पावसाने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजता जिल्ह्या त सरासरी ५६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात तब्बल ३१ मंडळात एकाच दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
शहर व जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली सायंकाळी या पावसाचा जोर वाढला. रात्री उशिरापर्यंत संततधार पाऊस सुरू होता. जिल्ह्यात ५६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये नांदेड तालुक्यातील सर्वच आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बिलोली तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली. मुखेड तालुक्यातील जांब या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
लोहा तालुक्यात पाचपैकी सहा मंडळात तर देगलूरमध्ये खानापूर या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुदखेड तालुक्यातील तीनही मंडळात अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे. धर्माबाद तालुक्यातील तीन उमरी एक आणि अर्धापूर तालुक्यात दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या दोन आठवड्यात पावसाने ताण दिल्याने बळीराजा चिंतीत झाला होता. परंतु दहा जुलैनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर पिकांची अवस्था चांगली झाली आहे.
पर्यायी रस्ता वाहून गेलानांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्ग- ५० वरील रस्तावर फुलवळजवळ पुलाचे बांधकाम चालू होते. येथे पर्यायी रस्ताने वाहतूक सुरु होती. मात्र ,जोरदार पावसाने नदीला पूर आल्याने हा पर्यायी रस्ता व पुलाखालील सेट्रींगचा सांगाडा वाहून गेला. दरम्यान, पर्यायी रस्ता नसल्याने निर्माणाधीन पुलावरूनच वाहतूक सुरु झाली. जडवाहने यावेळी पुलावर फसली.