शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

मदत वाटपाला चलन तुटवड्याचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:44 AM

खरीप पेरण्यांची धामधूम सुरु आहे. जिल्हा बँकेनेही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासह बोंडअळी आणि कर्जमाफीच्या रकमा वितरीत करण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभी केली आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे मदत वाटपास अडचणी येत आहेत. जिल्हा बँकेला दररोज ३ ते ४ कोटी रुपयांचे चलन आवश्यक असताना एसबीआयकडून दररोज केवळ १ कोटी रुपये दिले जात असल्याने मदतीसह पीक कर्जाचे वेळेत वाटप करण्यात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँक : गरज चार कोटींची उपलब्ध होतात एक कोटी, नियोजनबद्ध यंत्रणा असूनही नाही उपयोग

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खरीप पेरण्यांची धामधूम सुरु आहे. जिल्हा बँकेनेही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासह बोंडअळी आणि कर्जमाफीच्या रकमा वितरीत करण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभी केली आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे मदत वाटपास अडचणी येत आहेत. जिल्हा बँकेला दररोज ३ ते ४ कोटी रुपयांचे चलन आवश्यक असताना एसबीआयकडून दररोज केवळ १ कोटी रुपये दिले जात असल्याने मदतीसह पीक कर्जाचे वेळेत वाटप करण्यात अडचणी येत आहेत.खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी यंदा जिल्हा बँकेकडून १ एप्रिलपासून कर्ज वाटपाच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. जिल्हा बँकेच्या ६४ शाखांसह सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकºयांना हे कर्ज वितरीत करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा बँकेने १५२ कोटी ८२ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले असून जिल्ह्यातील ७ हजार ७९५ हेक्टर क्षेत्राला कर्जाचे संरक्षण मिळणार आहे. मात्र पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्हा बँकेचे १३ जूनपर्यंत १४ हजार ३६२ शेतकºयांना ३२ कोटी ५४ लाख २१ हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या २१ टक्के रक्कम पीक कर्जापोटी वाटप केली आहे. मागीलवर्षी याच कालावधीत जिल्हा बँकेतर्फे ८५ कोटी ६७ लाख ६२ हजार एवढ्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले होते. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाही पेरणीच्या तयारीत आहे.अशाच स्थितीत पीक कर्ज वाटपासह कर्जमाफी, बोंडअळीची नुकसान भरपाई आणि शासनाकडून जाहीर झालेल्या इतर मदतीच्या वाटपास गती देण्याची आवश्यकता आहे. मात्र आवश्यकतेएवढे चलन उपलब्ध होत नसल्याने मदत वितरणास गती मिळत नसल्याचे चित्र आहे.राज्य शासनाने मागीलवर्षी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. या घोषणेनुसार जिल्ह्यातील ३७ हजार सभासद शेतकºयांना ४९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. या कर्जमाफीच्या रकमांचेही सध्या वितरण सुरु आहे. दुसरीकडे गारपिटीची नुकसान भरपाई शेतकºयांना देण्यात येत आहे. गारपिटीचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी १३ कोटी ७६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार असून यामुळे ११ तालुक्यांतील ३५ हजार सभासद शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. या रकमेचेही वाटप जिल्हा बँकेतर्फे सुरु आहे.याबरोबरच बोंडअळीचा फटका सोसावा लागलेल्या कापूस उत्पादक शेतकºयांसाठीही ४२ कोटी ९० लाख नुकसान भरपाई टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. सदर रक्कम जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा बँकेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र या सर्व अनुदान वाटपासाठी आवश्यक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्हा बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा बँकेला चलन पुरवठा करणाºया एसबीआयने अधिकचे चलन उपलब्ध करुन दिल्यास शेतकºयांना पीक कर्जासह मदत वाटप वेळेत देण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.---शेतकºयांना वेळेत मदत मिळणार कशी ?पीक कर्जापोटी जिल्हा बँकेने १५२ कोटी ८२ लाखांचे उद्दिष्ट ठेवले असून यातील ३२ कोटी ५४ लाख रुपयांच्या रकमेचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ४९ कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. ३७ हजार सभासद शेतकºयांना ही कर्जमाफी द्यावयाची आहे.तर बोंडअळी नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यातील नायगाव वगळता इतर १५ तालुक्यांसाठी ४२ कोटी ९० लाख भरपाई वितरीत करावयाची आहे. याबरोबरच जिल्हा बँकेच्या ६४ शाखांचे दैनंदिन व्यवहार या सर्व बाबी पाहता बँकेला दररोज किमान ३ ते ४ कोटी चलनाची आवश्यकता आहे. मात्र दररोज एक कोटी रुपये एसबीआयकडून उपलब्ध केले जात आहेत. अशा स्थितीत शेतकºयांना वेळेत मदत मिळणार कशी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.---कापूस उत्पादकांना ४२ कोटींची भरपाईजिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना यंदा बोंडअळीचा फटका सोसावा लागला. या नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई म्हणून ४२ कोटी ९० लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये अर्धापूर तालुक्यातील २ हजार ३२८ शेतकºयांना ८२.०२ लाख, किनवट-१५०६६ शेतकºयांना ८ कोटी ७९ लाख, नांदेड तालुक्यातील १४१४ शेतकºयांना ५४.५३ लाख, माहूर तालुक्यातील २२ गावांतील शेतकºयांना ४२०.९६ लाख, लोहा तालुक्यातील ९०९५ शेतकºयांना २७५.७० लाख, हदगाव तालुक्यातील १६०१० शेतकºयांना ६१८.४५ लाख, मुदखेड तालुक्यातील १५३९ शेतकºयांना ६१.४५ लाख, मुखेड तालुक्यातील ३४४९ शेतकºयांना ९५.९२ लाख, भोकर तालुक्यातील १०७२३ शेतकºयांना ४३४.३५ लाख, बिलोली ३४७६ शेतकºयांना १३६.५७ लाख, हिमायतनगर ७०४४ शेतकºयांना ३२६.३४ लाख, देगलूर ३२३३ शेतकºयांना १६१.१३ लाख, कंधार १०१७ शेतकºयांना ३४१.१२ लाख, धर्माबाद ४९५९ शेतकºयांना १७४.७१ लाख तर उमरी तालुक्यातील ५ हजार ११७ शेतकºयांना १९८.०६ लाख नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यातील सुमारे २५ ते ३० टक्के रकमेचे जिल्हा बँकेतर्फे वाटपही करण्यात आले आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरु आहे.

टॅग्स :NandedनांदेडMONEYपैसाbankबँक