शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:30 AM

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे.

नांदेड - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा मराठा समाज एकटवला आहे. जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान सरकारने एक समिती गठण केली असून ही समिती मराठा समाजाच्या कुणबी असल्याचे पुरावे शोधत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून नांदेडमध्ये या समितीला काही मराठा बांधवांनी १०० वर्षांपूर्वीची तांब्याची घागरच कुणबीचा पुरावा म्हणून दाखवली. 

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे, मराठा समाजही आक्रमक आरक्षणासाठी एकटवला जात आहे. त्यातच, सरकारच्या समितीनेही वेगाने काम सुरू केल्याचं दिसून येत  आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या पडताळणीसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बुधवारपासून मराठवाड्यातील जिल्ह्याजिल्ह्यात जावून निजामकालीन आणि त्यापूर्वीचे पुरावे तपासत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या समितीतील अधिकाऱ्यांना नांदेडमध्ये पुराव म्हणून तांब्याची घागर दाखवण्यात आली. या घागरी संबंधित व्यक्तीच्या नावापुढे कु. असे लिहिले आहे, जे कुणबी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

माझे आजोबा गणपत हादजी कदम यांच्या काळातील एक भांड, ज्याच्यावर गणपत हादजी कु. असं त्यावेळी लिहिलेलं आहे. ते मी इथं आणलं असून आणखी दोन भांडे घरी आहेत, असे मराठा बांधव कदम यांनी म्हटले. तसेच, हे भांडं १९२० सालचं असेल, कारण १९८२ साली माझे आजोबा वारले, तेव्हा त्यांचं वय १०० वर्षे होतं, असेही त्यांनी सांगितले. तर, समितीने हा पुरावा ग्राह्य धरला नसून हे तुम्ही हाताने टाकलं असेल, असं समितीने म्हटलं आहे. मात्र, ते भांडं पुरावा म्हणून समितीने ठेऊनही घेतलं. 

छत्रपती संभाजीनगरमध्येही दिली भांडी

दरम्यान, सरकारने नियुक्त केलेली शिंदे समिती बुधवारी छत्रपती संभाजी नगरमधल्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाली. या समितीला पुरावे म्हणून दाखवण्यासाठी चक्क भांडी आणण्यात आणली होती. या भांड्यांवर कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, असा दावा करण्यात येतोय. मराठा पंचकमिटी बेमगपुरा यांच्यावतीने आंदोलकांनी सांगितलं की, आमच्याकडे अत्यंत पुरातन भांडी आहेत. या भांड्यावर कुणबी, अशा नोंदी आहेत. लग्न समारंभ आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमात कुणबी समाजाकडून या भांड्यांचा वापर होईल. 

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईNandedनांदेडJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील