शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

काळजी घ्या ! दिवाळीनंतर नांदेड शहरात कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 4:39 PM

दिवाळीच्या काळात रुग्णसंख्या  झपाट्याने कमी झाल्याने अनलॉक प्रक्रियेत सर्व व्यवहार सुरळीत झाले.

ठळक मुद्देशिक्षकांच्या कोरोना तपासणीतही रुग्णांचा आकडा वाढलादिवाळीच्या खरेदीची गर्दी ठरली रुग्णवाढीचे कारण

नांदेड: कोरोना संकटानंतर अनलॉक प्रक्रियेत दिवाळी सण हा उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी सणानिमित्त झालेली गर्दी  कोरोना रुग्णसंख्या शहरामध्ये वाढविणारी ठरली.  आठ दिवसांत ३८२ रुग्ण वाढले असून यात सर्वाधिक रुग्णसंख्याही नांदेड शहरातील आहे.

कोरोना संकटामुळे मार्चनंतर सर्वच सण, उत्सवावर विरजण पडले होते. दसऱ्यापर्यंत कोरोनाचा धोका कायमच होता.  मात्र दिवाळीच्या काळात रुग्णसंख्या  झपाट्याने कमी झाल्याने अनलॉक प्रक्रियेत सर्व व्यवहार सुरळीत झाले. त्यात दिवाळी सणही तोंडावर आला. त्यामुळे खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यातूनही रुग्णसंख्येत वाढ झाली. त्याचवेळी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. या तपासणीतही मोठ्या संख्येने रुग्ण पुढे आले. नांदेड शहरातच शिक्षकांच्या तपासणीदरम्यान रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेची भीती कायम असून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना महापालिका जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्या सूचनांचे पालन न केल्यास रुग्णसंख्या वाढून पुन्हा एकदा  लॉकडाऊनची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

जिल्ह्यात पाच मृत्यूदिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी गेले आहेत. यात १८ नोव्हेंबर रोजी दोघांचा मृत्यू झाला आहे तर १६ नोव्हेंबर, २२ व २३ नोव्हेंबर रोजी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवाळीनंतर कोरोनाबळींची संख्या घटली आहे. १७ नोव्हेंबर व १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान एक मृत्यू झाला.

दिवाळीच्या खरेदीची गर्दी ठरली रुग्णवाढीचे कारणदिवाळी सणासाठी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेत आले. ही खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सींगचे कोणतेही पालन झाले नाही. अनेकांनी मास्कचा वापरही टाळला. त्यातून कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या वाढली.  जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी नांदेड शहरात दाखल झाले होते.

दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली होती. परिणामी सर्व व्यवहार सुरळीत झाले. त्यात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली. जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ ही नांदेड शहर आहे. त्यात शिक्षकांच्याही चाचण्या वाढल्या.- डॉ. सुरेशसिंह बिसेन, मनपा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्या