लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यात सर्व महामार्गावरुन प्रवास करताना कुठेही स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, त्यामुळे प्रवाशांची विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. ही बाब हेरुन भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.सर्व महामार्गावर प्रवाशांसाठी किमान दर १०० किमी अंतरावर स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी, प्रवासात महिलांची सुरक्षा हा मुख्य मुद्दा करुन त्यानुसार स्वच्छतागृहाची रचना असावी, स्वच्छतागृह किती अंतरावर आहेत, याचे बोर्ड महामार्गावर लावावेत, गुगल मॅप सर्चवर टॉयलेटचा उल्लेख असावा, त्याशिवाय आरटीओकडून परवानगी देऊ नये, स्वच्छतागृह स्वच्छ असावे, प्रकाश आणि पाण्याची सोय असावी, वीज, पंखे, यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याची व्यवस्था असावी, स्वच्छतेची देखभाल करण्यासाठी खाजगी संस्था- कंपन्या- महिला बचत गट- महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना काम द्यावे, देखभाल करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असेल त्याचा ई-मेल, मोबाईल नंबर लिहिलेला असावा, तिथे देखभाल करणारी महिला असावी, तिच्याजवळ तक्रारवही- सूचनावही असावी, सॅनिटरी चॅपकीन्स व्हेंडीग मशीन आणि विल्हेवाटीसाठी इन्सीनेटर असावे, खिडक्या, दारे बंद होणारी असावीत, दाराच्या कड्या लागणा-या असाव्यात, चोवीस तास पाण्याची सोय असावी, पर्स व इतर सामान अडकविण्यासाठी खुंटीची व्यवस्था असावी, लहान बाळाच्या पालकांसाठी झोपवून नॅपी बदलण्याची व्यवस्था असावी, ज्येष्ठ- अपंग महिलांसाठी रॅम्पची सुविधा असावी, सर्व महामार्गावरील स्वच्छतागृहाची देखभाल करणा-या यंत्रणेकडून जर योग्य देखभाल होत नसेल तर प्रवाशांनी कोणाकडे तक्रार करावी, याची माहिती-फोन नंबर दिले जावे, तक्रारीची गंभीर दखल घेवृून योग्य ती कार्यवाही करण्याची तरतूद असावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.या मागण्यांसदर्भात जिल्हाधिकाºयांनी गंभीरपणे विचार करुन यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. जिल्हाधिका-यांना भेटलेल्या शिष्टमंडळात प्रा. सुरेखा किनगावकर, प्रा. शालिनी वाकोडकर, प्रा. रेणुका कुरुडे, प्रा. डॉ. कल्पना कदम, प्रा. डॉ. अर्चना झाडबुके, प्रा.डॉ. मीना घुमे, प्रा.क्षमा करजगावकर, प्रा. मेघा कांबळे, प्रा. पल्लवी चिन्नावार, विद्या जमदाडे, सुचिता पेन्सलवार यांचा समावेश होता.
महामार्गावर आम्ही ‘तिकडे’ जावे कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:20 AM
राज्यात सर्व महामार्गावरुन प्रवास करताना कुठेही स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, त्यामुळे प्रवाशांची विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. ही बाब हेरुन भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
ठळक मुद्देभारतीय स्त्री शक्ती संघटनेची स्वच्छतागृहाची मागणी