शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

महामार्गाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:55 AM

किनवट-भोकर-मुदखेड-नांदेड या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग या राष्ट्रीय महामार्ग क्ऱ १६१ ए़ हिमायतनगर - कोठारी या रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन व धिम्या गतीने होत आहे.

ठळक मुद्देदर्जा घसरला : किनवट- भोकर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण कधी होणार ?

किनवट : किनवट-भोकर-मुदखेड-नांदेड या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग या राष्ट्रीय महामार्ग क्ऱ १६१ ए़ हिमायतनगर - कोठारी या रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन व धिम्या गतीने होत आहे.काम पूर्ण केव्हा होणार असा सवाल धुळीमुळे त्रस्त झालेले प्रवासी वाहनचालक विचारत आहेत़ याच मार्गावर काही ठिकाणी कामाला सुरुवात नसल्याचे दिसून येत आहे़ सबग्रेड (मुरुम भराव) च्या कामा -पलीकडे काही काम सरकता सरकत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़मोठा गाजावाजा करून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला़ त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली़ कामही गुतेदाराला मिळाले़ मात्र ज्या गुत्तेदाराला हे काम मिळाले त्याने सब एजन्सीला काम देऊन मोकळे होत कामाची वाट लावली आहे़ सुरू असलेल्या कामावर देखरेख नाही़ मुरूम लेअरवाईज टाकणे, पाणी शिंपडणे, दबई करणे या कामाचा अभाव असून कुठे चढ कुठे खड्डा, कुठे उतार चढाव अशी स्थिती असून एकदाच काम सुरू करून वाहन चालकांना त्रासून टाकले आहे़ या कामावर कुठेच डायव्हर्शन दिसत नाही़ सध्या लगीनघाई सुरू आहे़ हिमायतनगर ते किनवटला यायचे झाल्यास पांढरेशुभ्र कपडे घालून निघालेल्या वºहाडी मंडळींना धुळीमुळे काळे पांढरे व्हावे लागत आहे़या मार्गावर नळकांडी बनवली नाही़ परिणामी पावसाळ्यात हा मार्ग वाहनचालक व प्रवाशांना डोकेदुखी ठरणार आहे़ कामाला सुरुवात झाली तेव्हापासूनच काम दर्जाहीन होत असल्याची ओरड सुरू झाली़ मात्र संबंधितांना काम करून घ्यायची घाई झाली अन् इकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, ही चिंतेची बाब आहे़ बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराला दबाई खाली टाकू असा गर्भित इशारा भूमिपूजन कार्यक्रमात वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता़ मात्र सरसम (बु़) ते कोठारी मार्गाचा ठेका घेणाºया गुत्तेदारावर याचा परिणाम झाला नाही यास काय म्हणावे? राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामावर हजर नसतात़ त्यामुळे कामाची वाईट परिस्थिती दिसून येत आहे़ सबग्रेडच्या पुढे काम सरकले नाही़ या कामांवर वळण मार्ग किंवा काम सुरु असल्याचे फलक न लावल्याने रेडियमच्या फलकाअभावी रात्रीला काम कुठे सुरू आहे हे समजत नसल्याने वाहनधारक गोंधळात पडत आहेत़कामाला गती देण्याबाबत संबंधितांना वारंवार बोलूनही कामाला अजिबात गती नाही व दर्जा नाही़ केवळ खोदकाम व मुरुमभराव सबग्रेड या कामातच वेळ घातला जात आहे़ त्यात धरसोड पद्धतीचा अवलंब यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास केव्हा जाणार? असा सवाल या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालक विचारत आहेत़ छोटे- मोठे पुलाच्या कामाला तर अद्यापही सुरुवातच झाली नाही.याबाबत मॅनेजमेंट सल्लागार दत्तात्रय पावसे यांनी सांगितले, येत्या काळात कामाला गती देण्याची ग्वाही संबंधितांनी दिली असून हिमायतनगर जवळ दहा किमी अंतराचे काँक्रेटचे काम हाती घेतले आहे़ सध्या उन्हाळा आहे़ त्यामुळे पाण्याअभावी सबग्रेडचे काम थांबविण्याच्या सूचना दिल्या असून पावसाळ्यात काँक्रेटच्या कामाला गती मिळेल़हिमायतनगर ते कोठारी मार्ग त्रासदायकराज्यात व त्यातल्या त्यात धनोडा ते कोठारी या मार्गावर शिस्तीने व नियोजनबद्ध काम सुरू आहे़ डायव्हर्शन व रेडियम लावलेले फलक जागोजागी दिसतात़ पण हिमायतनगर ते कोठारी या कामावर त्याचा अभाव दिसून येत आहे़ त्यामुळे हिमायतनगर ते कोठारी हे काम राष्ट्रीय महामार्गाचे की पाणंद रस्त्याचे हेही समजायला मार्ग नाही़धरसोड पद्धतीने होणा-या कामामुळे या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालक कंटाळवाणे झाले आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडroad transportरस्ते वाहतूक