शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गुरुद्वारा येथे होळी महोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:50 PM

येथील सचखंड गुरुद्वारा येथे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, पंचप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली होला महल्लाचे आयोजन करण्यात आले आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या या उत्सवासाठी देश-विदेशातील तब्बल ६० हजारांवर भाविक नांदेडात दाखल झाले आहेत़

ठळक मुद्दे६० हजार भाविक दाखल : २ मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :येथील सचखंड गुरुद्वारा येथे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, पंचप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली होला महल्लाचे आयोजन करण्यात आले आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या या उत्सवासाठी देश-विदेशातील तब्बल ६० हजारांवर भाविक नांदेडात दाखल झाले आहेत़गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक थानसिंह बुंगई म्हणाले, होला-महल्लानिमित्त गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यात शीख पंथाचे महान कवी, कीर्तनकार, वीररसाद्वारे संगतला गुरु इतिहास सांगतील़ २८ फेब्रुवारीला शीशगंज सेवक जत्था दिल्लीच्या वतीने कीर्तन दरबार होणार आहे़ त्यात शीख पंथाचे सुप्रसिद्ध रागी पद्मश्री भाई निर्मलसिंघजी खालसा, भाई गुरइकबालसिंघजी, भाई गुरमित सिंघजी कीर्तन-प्रवचन करणार आहेत़रात्री ९ वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार असून मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे़ गेल्या ७० वर्षांपासून मुंबईचे भाई जैमलसिंघजी सहगल परिवाराची होळी महोत्सवात रैन सवई कीर्तनाची परंपरा आहे़ यंदा १ मार्च रोजी रात्री नऊ वाजता रैन सवई कीर्तन होणार आहे़ त्यात सुप्रसिद्ध दरबार साहिब, अमृतसरचे रागी भाई जगरुपसिंघजी, भाई देविंदरसिंघजी, भाई अमरजितसिंघजी पटीयालावाले हे प्रवचनाद्वारे संगत करणार आहेत़ २ मार्च रोजी परंपरागत होळी महोत्सवानिमित्त होला-महल्ला (हल्लाबोल) नगरकीर्तन निघणार आहे़ त्यात देश-विदेशातील जवळपास सव्वालाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे़महोत्सवाच्या तयारीसाठी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष तारासिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डाचे सदस्य परिश्रम घेत आहेत़ बाहेरुन येणाºया भाविकांची श्री गुरुग्रंथ साहिब भवन, मंगल कार्यालय, शाळा या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे़ ठिकठिकाणी भाविकांच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे़दरवर्षी होला-महल्लानिमित्त गुरुद्वारा येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ त्यामध्ये देशभरातील भजनी मंडळेही उत्साहाने सहभाग घेतात़ गुरुद्वारा येथून निघणारा हल्लाबोल पाहण्यासाठीही शहरवासियांसह इतर जिल्ह्यांतूनही भाविक दाखल होतात़विमान, रेल्वे गाड्या हाऊसफुल्लहोला-महल्लासाठी नांदेडात येणाºया भाविकांची संख्या लक्षणीय असून अमृतसर ते नांदेडदरम्यान धावणारी सचखंड एक्स्प्रेस मागील आठवडाभरापासून हाऊसफुल्ल आहे़ त्याचबरोबर पंजाब व हरियाणा येथून खाजगी वाहनांनी भाविक नांदेडात दाखल होत आहेत़ अमृतसर-नांदेड चालणारी एअर इंडियाची विमानसेवाही हाऊसफुल्ल आहे़ दररोज नांदेडात भाविकांचे जत्थे दाखल होत आहेत़