नांदेड : नांदेड मुख्यालयातंर्गत नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट, भोकर पथकातील १७२ पुरुष अन् १५३ महिला होमगार्ड पदाच्या रिक्त जागांसाठी २५ ते २७ मार्च या कालावधीत नावनोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली आहे.रिक्त अनुशेष नांदेड पुरुष-९९ व महिला -४९ , बिलोली पुरुष-१७ व महिला -२७, हदगाव पुरुष-१५ व महिला -२४, मुखेड पुरुष-४ व महिला -११, देगलूर पुरुष-८ व महिला -६, कंधार पुरुष-१६ व महिला -२० , किनवट पुरुष-४ व महिला -५, भोकर पुरुष-९ व महिला -११ होमगार्डच्या रिक्त पदासाठी ही नावनोंदणी करण्यात येणार आहे.या नाव नोंदणीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २० ते ५० वर्षे अशी आहे. उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा. पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान १६२ सें.मी., छाती न फुगवता ७६ सें. मी. आणि फुगवून ८१ सें. मी. असावी. १६०० मीटर धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी अनिवार्य आहे. तसेच उमेदवार सुशिक्षित बेरोजगार नसावा.महिला उमेदवारांसाठी उंची किमान १५० सें. मी. असावी. ८०० मीटर धावणे व गोळाफेक अशी मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारास या चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीत कमी ४० टक्के गुण आवश्यक राहतील. याव्यतिरिक्त आयटीआय प्रमाणपत्र खेळाचे कमीत कमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, एन.सी.सी. ‘बी’ किंवा ‘सी’ प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र, जडवाहन चालविण्याचा परवाना या प्रमाणपत्र धारकांना तांत्रिक अर्हता गुण दिल्या जातील. होमगार्ड ही निष्काम सेवा असलेले संघटन आहे. होमगार्ड स्वयंसेवकांना कुठलाही नियमित पगार किंवा मानधन दिल्या जात नाही. कर्तव्य बजावल्यानंतरच कर्तव्य भत्ता दिला जातो.
- २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पोलीस मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद येथे नावनोंदणी करण्यात येईल. सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व शारीरिक चाचणी घेण्यात येईल. नावनोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असल्याचे मूळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन रंगीत छायाचित्रे, रहिवासी असल्याचा सक्षम पुरावा आवश्यक
- इतर शैक्षणिक कागदपत्रे झेरॉक्स प्रतिसह सोबत आणावीत. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या पुरुष, महिला उमेदवारांची मैदानी चाचणी २६ मार्च रोजी सकाळी ५ पासून शहीद भगतसिंग चौक असर्जन नाका विष्णुपूरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.