धर्माबाद : तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना,दिवाळी सणाला अनुदान मिळाले नसुन आता तरी मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी छोठे बँकीगं, पोस्ट ऑफिस, तहसिल कार्यालयाला खेटे मारुन परेशान आहेत.
धर्माबाद तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण लाभार्थी १२१२ असून श्रावणबाळ योजनेचे एकूण लाभार्थी १५९५ आहेत तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचे एकूण लाभार्थी १०१८ आहेत. या योजनेचे एकूण लाभार्थी ३८२५ आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले पण ऑक्टोबर, नोव्हेंबर महिण्याचे दोन महिन्यांचे अनुदान मिळाले नाही.दिवाळी सणात लाभार्थी गोडधोड पासून वंचित राहिले आहेत. आता डिसेंबर महिना संपायला आला असून या महिण्याचे सुद्धा अनुदान लांबणीवर पडली आहे.अनुदान आज मिळेल उद्या मिळेल वयोवृद्ध लाभार्थी तहसिल, बँक, पोस्ट ऑफिस ला खेटे मारुन परेशान आहेत. दर महिन्याला अनुदान १००० रुपये असुन महिण्याचे महिना मिळायला पाहिजे पण येथील तहसिलदार दुर्लक्ष करित असल्याचे लाभार्थी बोलत आहेत. आशाने पैसे मिळतील म्हणून लाभार्थी बँकेसमोर ठाण मांडून बसतात. लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी लाभार्थी करित आहे. लाभार्थीचे वरुनच पैसे आले नसल्याचे तहसिल विभागाने सांगितले आहे.