लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात वर्षभरापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज भरुन घेण्यात आले असले तरी वर्षभरात शहरात एकाही घराचे काम पूर्ण झाले नाही. उलट महापालिकेकडून या योनजेअंतर्गत पाठविलेल्या ४ विकास आराखड्यांना फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येईल, याकडे लाभार्थी आशाळभूत नजरेने डोळे लावून आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गतवर्षी सर्वासाठी घरे या अंतर्गत महापालिकेने घरांसाठी अर्ज भरुन घेतले. महापालिकेने ३ सप्टेंबर २०१६ पर्यंत घरकुलांसाठी अर्ज भरुन घेतले होते. त्यामध्ये ५१ हजार ७६ अर्ज आॅनलाईन आले होते. अर्ज भरण्याची स्थानिक मुदत संपली असली तरी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अजूनही अर्ज भरता येत आहेत. या संकेतस्थळवर नांदेडमधील १ हजार ८९७ अर्ज भरण्यात आले आहेत.ही योजना तीन प्रकारांमध्ये राबविली जाणार आहे. लाभार्थ्यांना घरकुलांसाठी कर्ज स्वरुपात रक्कमही देण्यात येणार आहे. अशा ७ हजार ६६ लाभार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. खाजगी भागिदारी तत्वावरील शहरातील भाडेकरुसाठी घर मिळणार आहे. असे २० हजार २७९ आणि स्वत: बांधकाम करण्यास तयार असलेल्या लाभार्थ्यांचेही २३ हजार ७२७ अर्ज प्राप्त झाल आहेत.या प्राप्त अर्जानंतर महापालिकेने शहरात जवळपास ७० टक्के सर्वेक्षण पूर्ण केले आहे.नांदेड महापालिकेने या योजनेअंतर्गत शासनाकडे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार वेळा विकास आराखडा पाठविला होता. चारही वेळा तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने आता विकास आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी सल्लागार संस्थांचे अर्ज मागविले आहेत. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यातून आता संस्थेची निवड केली जाईल. या संस्थेमार्फत आता पुन्हा एकदा नव्याने विकास आराखडा शासनाला पाठविला जाणार आहे.महापालिकेच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरात जवळपास ५३ हजार अर्ज आले असले तरी २०२२ पर्यंत राबविण्यात येणाºया या योजनेला नांदेडमध्ये २०१७ साल संपत आले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवातच झाली नाही. हे काम कधी सुरु होईल, याकडे लक्ष लागले आहे.
सर्वांसाठी घरकुले योजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:29 AM
शहरात वर्षभरापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज भरुन घेण्यात आले असले तरी वर्षभरात शहरात एकाही घराचे काम पूर्ण झाले नाही. उलट महापालिकेकडून या योनजेअंतर्गत पाठविलेल्या ४ विकास आराखड्यांना फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येईल, याकडे लाभार्थी आशाळभूत नजरेने डोळे लावून आहेत.
ठळक मुद्देपंतप्रधान आवास : १ हजार ८१७ जणांना प्रतीक्षा