नांदेड विभागात यावर्षी ११० व्यक्तिगत आणि २३ सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. २३ सांघिक पुरस्कारांमध्ये १२६ कर्मचाऱ्यांना रेल्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अप्पर विभागीय रेल्वे प्रबंधक नागभूषण राव, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जय शंकर चौहान, आदी उपस्थित होते.
नांदेड विभागाने दक्षिण मध्य रेल्वेमध्ये क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. या वर्षी नांदेड रेल्वे विभागाला तीन शिल्ड (ढाल) मिळाल्या आहेत. ज्यात उत्कृष्ट रेल्वे पटरी (बेस्ट ट्रेक), उत्कृष्ट सुरक्षा (सेफ्टी) आणि नवकल्पना (इनोव्हेशन्स) या तीन शिलन्चा समावेश आहे. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी सर्वांचे कौतुक केले.
प्रारंभी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात नांदेड विभागाने केलेल्या कार्याची माहिती दिली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्य करण्याकरिता सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. सुरक्षित, सुखद प्रवास हे नेहमी आपले प्राधान्य राहिले पाहिजे, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले.
यावर्षी मुदखेड ते परभणी दरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्यात आले. या वर्षी नांदेड रेल्वे विभागात ४२६ नवीन कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली, तर ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. किनवट आणि मुदखेड येथे कर्मचारी शिकायत शिबिर आयोजित केले गेले. सर्व रेल्वे स्थानकावर मुफ्त वाय-फाय सुविधा प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.