युनूस नदाफ।पार्डी : हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आहे़ या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी झालेल्या हळदीच्या बीटमध्ये १० हजार ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या भावात वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतेत होता़ हळदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते़ परंतु, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ गेल्या आठवड्यात हळदीला ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये भाव मिळाला होता़ त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हळद विकण्याचे थांबविले होते़ परंतु शनिवारी हळदीच्या बिटात भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ तसेच हरभऱ्याच्या भावात वाढ झालेली आहे़सुरुवातीस हरभऱ्याला ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ परंतु, बाजारात हरभऱ्याची आवक थंडावल्याने हरभऱ्याचे भाव कडाडले आहेते़ ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे़ शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे खळे करताच बाजारात हरभरा विक्रीस नेला होता़ आता शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक राहिला नसून बाजारात हरभऱ्याची आवक थंडावल्याने हरभऱ्यांचे भाव मात्र कडाडले आहेत. शनिवारी हरभऱ्याची ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपयांपर्यंत खरेदी केल्याचे शेतकरी सांगत आहेत़ मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीचे उत्पादन अधिकअर्धापूर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून बाजारात शेतकऱ्यांना हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही़ हळदीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला असून लागवडीपासून ते हळद डोल करून बाजारात नेण्यापर्यंत खर्च झाला आहे़परंतु, हळदीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता़उत्पादनवाढीसाठी मोठा खर्चगेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत़ शेतीचा खर्च भरपूर करण्यात येत आहे़ त्याचबरोबर उत्पादन वाढीसाठी पिकावर भरपूर खर्च करण्यात येते़ परंतु, मालाला भाव योग्यप्रकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे़भाव नसल्याने शेतकरी अडचणीतगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्धापूर तालुक्यात हळदीचा भाव घसरलेल्या स्थितीत दिसत आहे़ हळदीला मनासारखा भाव मिळत नसल्याने बाजारपेठेत हळदीची आवक थंडावली असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे़ दरम्यान, यावर्षी अर्धापूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली होती़ त्यामुळे उत्पादनात मोठी वाढही झाली आहे़ परंतु, भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत़ शेतकऱ्यांना मनाप्रमाणे भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ परंतु, गतवर्षीसारखा यावर्षी बाजारात हळदीला भाव मिळत नाही, असे सांगण्यात येत आहे़
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हळदीचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:22 AM
हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आहे़ या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी झालेल्या हळदीच्या बीटमध्ये १० हजार ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़
ठळक मुद्देहरभऱ्याची आवक थंडावलीभाव वाढल्याने शेतकरी आनंदी