नांदेड : कोराेना काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे, परंतु असे असताना सोशल मीडियावर गुंडागर्दी वाढल्याचेही दिसून येत आहे. तलवार घेऊन नाचताना, केक कापताना, हातात देशी कट्टे, बंदूक घेऊन फोटो व्हायरल करणे अनेकांना महाग पडत आहे.
सोशल मीडियावर लक्ष
सोशल मीडियावर अनेकजण शस्त्रे घेऊन छायाचित्र टाकली जात आहेत. वाढदिवस असताना तलवारीने केक कापणे हा गुन्हाच आहे. अशा भाईंच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
- पोनि द्वारकादास चिखलीकर
तलवारीने केक कापण्याची फॅशन
मित्रमंडळीत एखाद्याचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु तो साजरा करताना अनेकजण केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करतात. त्यानंतर तलवारी हातात घेऊन नाचतानाचे व्हिडिओही काढण्यात येतात. सध्या तशी फॅशनच सुरु झाली आहे, परंतु असा प्रकार करणे हा गुन्हा आहे.
नव्यानेच तारुण्यात आलेले अनेकजण हातात बंदूक, तलवार आणि चाकू बाळगत आहेत.शस्त्रे हातात घेऊन ते आपले छायाचित्र, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत. अशाप्रकारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सर्व लोक आता रडारवर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लाईक करणारेही
येणार अडचणीत
n सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या गुंडांच्या पोस्टला लाईक आणि त्यावर कमेंट करणारेही आता अडचणीत येणार आहेत. पोलिसांनी अशा व्यक्तींना सहआरोपी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढे अशा पोस्टला लाईक किंवा कमेंट करताना अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे.