शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आडवे ऑक्सिजन सिलिंडर उभे; प्रशासकीय यंत्रणा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 1:05 PM

याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुसऱ्याच दिवशी आडवे असलेले ऑक्सिजन सिलिंडर उभे करण्यात आले असून पाईपलाईनद्वारे जोडणीही सुरू झाली आहे़.

ठळक मुद्दे दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय असताना केवळ ऑक्सिजन नसल्यामुळे या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यात येत नव्हते़ दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या दोनशे खाटांच्या रुग्णालयात केवळ पाचच रुग्ण दाखल

- शिवराज बिचेवार

नांदेड :  श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय असताना केवळ ऑक्सिजन नसल्यामुळे या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यात येत नव्हते़ तर दुसरीकडे बेड मिळत नसल्याने सर्वच रुग्णालयांत रुग्ण वेटिंगवर आहेत़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुसऱ्याच दिवशी आडवे असलेले ऑक्सिजन सिलिंडर उभे करण्यात आले असून पाईपलाईनद्वारे जोडणीही सुरू झाली आहे़ 

दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या दोनशे खाटांच्या रुग्णालयात केवळ पाचच रुग्ण दाखल असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती़ त्यानंतर तातडीने हालचाली करीत दुसऱ्याच दिवशी १३ हजार किलो क्षमतेचा आडवा असलेला ऑक्सिजन सिलिंडर उभा करण्यात आला़ या सिलिंडरपासून रुग्णालयातील प्रत्येक बेडपर्यंत पाईपलाईनद्वारे आॅक्सिजन पुरवठा करण्याच्या कामालाही गती आली आहे़ त्यामुळे लवकरच या ठिकाणी रुग्णांना दाखल करता येणार आहे़ तर दुसरीकडे विष्णूपुरी येथील रुग्णालयातील कोरोना कक्षांची अधिष्ठाता डॉ़ सुधीर देशमुख यांनी पाहणी केली़ या ठिकाणी आणखी दोन कोरोना कक्ष उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या़ 

रेमडेसिवीरसाठी आता वणवणकोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांना सध्या रेमडेसिवीर हे इंजेक्शन अत्यंत आवश्यक आहे़ खाजगी कोविड सेंटरच्या काही औषधी दुकानात ते उपलब्ध आहेत़ तर काही ठिकाणी स्टॉक संपला आहे़ त्यामुळे हे इंजेक्शन आणण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांवरच टाकली आहे़ इंजेक्शनच्या शोधात नातेवाईकांची मात्र चांगलीच फरपट होत आहे़ ६ इंजेक्शनसाठी तब्बल ३२ हजार ४०० रुपये मोजावे लागत आहेत़ नांदेडातील एकाही खाजगी रुग्णालयात आणि दोन्ही शासकीय रुग्णालयांत सध्या खाटाच उपलब्ध नसल्यामुळे वेटिंगवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे़ एकट्या विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी तब्बल १५ रुग्ण खाट मिळण्याच्या प्रतीक्षेत होते़ जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयातील संख्या तर त्याहून अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड