गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात गत सात वर्षांतील आवास योजनेतील उद्दिष्टे ३ हजार ८८३ असताना अवधी १ हजार ५८३ घरकुलांची कामे पूर्ण झाली असल्याचे समोर आले आहे.गत वर्षापासून रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेची उद्दिष्टे पार करणे कठीण झाले असल्याचे अहवालावरुन दिसते. २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये १ हजार ७५२ चे उद्दिष्टे असताना अवधी १४ घरांची कामे पूर्ण झाल्याने आवास योजना संथगतीने मार्गक्रमण करीत असल्याचे दिसते. ‘डीएसी’ ने गत काही दिवसात लाभार्थी डळमळीत झाल्याचे चित्र आहे. ‘घर पूर्ण करता का हो’ म्हणण्याचा प्रसंग लाभार्थ्यांवर ओढावल्याचे समोर आले आहे.शासनस्तरावरुन बेघर, गोर-गरीबांना हक्काचे पक्के घर असावे, यासाठी आवास योजनेतून घर बांधकाम करण्यासाठी लाभार्थिंना अनुदान दिले जाते. त्यातून घर साकारले जाते. विविध टप्प्यातून अनुदान वितरण केले जाते.घर मिळविण्यासाठी प्रस्ताव करतानाच लाभार्थींची मोठी दमछाक होते. मंजुरी, तांत्रिक मान्यता यातून बाहेर पडल्यानंतर अनुदान टप्प्या-टप्प्याने मिळते. घर बांधकामाला गती मिळते. अन् बांधकाम पूर्ण होऊन घरात प्रवेश करण्याची उत्सुकता लागते.सन २०११-१२ ते २०१७-१८ या कालावधीत तालुक्याचे इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट ३ हजार ८८३ होते. त्यासाठी ६ हजार ८२० ची नोंदणी झाली. २७ डिसेंबरच्या अहवालानुसार ३ हजार ३२० लाभार्थ्यानना पहिला हप्ता देण्यात आला. दुसरा हप्ता २ हजार १२० व तिसरा १ हजार ३९० जणांना देण्यात आला. फक्त १ हजार ५८३ लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले. ५० टक्केही उद्दिष्ट पार करण्यात यश आले नाही.गत काही दिवसात ‘डीएसी’ चे नूतणीकरण व मुदतवाढ रेंगाळल्याने लाभार्थ्यांना निधी वर्ग करण्याचे काम ठप्प झाले. त्यामुळे लाभार्थ्यांचा जीव कासावीस झाला आहे.२०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीत कामे पूर्ण झाल्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु २०१६-१७ व चालू वर्षातील कामे पूर्ण करण्याचे प्रमाण नगण्य आहे. याला गती कधी मिळणार हा प्रश्न आहे. कार्यालयीन प्रमुखा0ंना सहकार्य करण्याची पंचायत समिती कर्मचाºयांची भूमिका असावी. परंतु तसे दिसत नाही. आवास योजनेतही घडल्याचे मानले जात आहे. ‘डीएसी’ चालू झाल्याने १८४ लाभार्थ्यांना देयके वर्ग केल्याचे समजते.लाभार्थिंना हेलपाटे घालण्याचा प्रसंग दप्तर दिरंगाईने आणला आहे. प्रत्येक योजनेची अंमलबजावणी ही नियमानुसार होत असताना अनेक कर्मचारी वरिष्ठांनाा कोंडित धरणे योग्य नाही. परंतु अनेक कर्मचारी सहकार्याची भूमिका घेत नसल्याने लाभार्थिंना नाहक त्रास अनेकदा सहन करावा लागत आहे. आता २८ डिसेंबरपासून ‘डीएसी’ पूर्ववत चालू झाल्याने १८४ लाभार्थिंना देयके वर्ग झाले-उत्तम चव्हाण,पं. स. सदस्य, कंधार४घरकुल योजनेसाठी माझी मंजुरी २०१४-१५ ची आहे. बांधकाम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र, अंतीम हप्त्यासाठी पायपीट करावी लागत आहे. १८४ मध्ये माझा समावेश आहे की नाही पहावे लागेल -रामकिशन वाघमारे दैठणा
कंधार तालुक्यात आवास योजना संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:00 AM