- सुनील जोशी
नांदेड : कोविड-२०१९ च्या लॉकडाऊनमुळे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला होता़ राज्यस्तरीय तदर्थ समितीची बैठक लॉकडाऊनमुळे झालीचनसल्याने या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़
१० वीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की? पाच विषयांच्या गुणांची सरासरी करून भूगोल विषयाचे गुण द्यायचे किंवा इतिहास विषयात जेवढे मार्क विद्यार्थ्यांना पडले तेवढेच मार्क भूगोलला देऊन सुवर्णमध्य साधायचा, हा विषय बोर्डाच्या अधिकाऱ्यांपुढे आहे़ यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बोर्डाची उच्चस्तरीय तदर्थ समिती आहे़ या समितीमध्ये राज्यात असलेल्या विविध मंडळांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, पालक, संस्थाचालक यांचा समावेश आहे़ समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे अपेक्षित होते़ मात्र लॉकडाऊनमुळे तसे झाले नाही़ दरम्यान, लॉकडाऊनमुळे दहावी परीक्षेचे पेपर अद्यापही संबंधित तपासणीस यांच्याकडे पडून आहेत़ विद्यार्थ्यांना अॅव्हरेज गुण दिले जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव औदुंबर उकीरडे यांनी सांगितले. सगळ्या विषयांचे गुण मिळून अॅव्हरेज गुण द्यायचे की, जेवढे इतिहासचे गुण मिळाले, तेवढे भूगोलमध्ये द्यायचे, याचा निर्णय घेतला जाईल.
निकाल १० जूनपूर्वीच1 १० जूनपूर्वी निकाल लावावेत, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. कालच बोर्डाच्या अध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिग झाली. मधल्या काळात काही ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक झाल्याने उत्तरपत्रिका आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.
2 सध्या दहावीचे ३० टक्के आणि बारावीचे ७० टक्के काम झाले आहे. आजपासून आम्ही प्रत्येक मॉडरेटरसोबत झुमवर बैठक घेणे सुरु केले आहे. पुढील पाच ते सात दिवसांत बऱ्याचशा उत्तरपत्रिका जमा होतील.
3 जे हॉटझोनमध्ये राहतात, त्यांच्याकडील उत्तरपत्रिका आम्ही स्वत: जमा करून घेऊ अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली.
मॉडरेटरांना क्वारंटाईनची भीती शासनाने आदेश काढल्याप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणीचे काम होईल़ पुढे मॉडरेटरकडे पाठविल्या जातील व नंतर मॉडरेटर लातूर बोर्डाकडे उत्तरपत्रिका घेऊन जातील़ मात्र, १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार तर नाही ना अशी भीती मॉडरेटरमध्ये पसरली आहे.बोर्डानेच पुढाकार घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी उत्तरपत्रिका जमा करायला लावाव्यात व त्या घेण्यासाठी लातूरहूनच चारचाकी वाहन पाठवावे, जेणेकरुन ते सर्वांच्याच सोयीचे होईल, असा मतप्रवाह मॉडरेटरमध्ये सुरु आहे.