शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 2:29 PM

परीक्षा ऑफलाइन घेतल्यास त्यात भ्रष्टाचार हाेण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यातूनच गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

- राजेश निस्तानेनांदेड : गेल्या चार वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ पदांची भरती रखडली आहे. मात्र, त्यासाठी १२ ते १३ लाख उमेदवारांचे अर्ज आल्याने ही परीक्षा घ्यायची कशी, याचा पेच राज्य सरकारपुढे निर्माण झाला आहे. त्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

२०१९ ला जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील १३ हजार ५२१ पदांसाठी नाेकरभरतीची जाहिरात काढली गेली हाेती. मात्र, प्रत्यक्षात ही भरती अद्याप घेतली गेली नाही. मध्यंतरी काेराेना काळातील दाेन वर्षे त्यासाठी प्रमुख अडचण ठरली. या भरतीसाठी १२ लाख ७२ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बहुतेकांनी एकापेक्षा अनेक जागांसाठी अर्ज केल्याने ही संख्या वाढली आहे. काहींनी तर चार ते पाच पदांसाठी अर्ज केल्याची माहिती आहे. ही भरती ऑनलाइन की ऑफलाइन याचाही गाेंधळ आहे. कारण, ऑनलाइन घ्यायची झाल्यास परीक्षा केंद्रांवर वायफाय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात तालुकास्तरावरसुद्धा शाळा-महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. परीक्षा ऑफलाइन घेतल्यास त्यात भ्रष्टाचार हाेण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यातूनच गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

१२ लाख उमेदवारांची परीक्षा एकाचवेळी घ्यायची कशी, याचा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आहे. कारण आयबीपीएस व टीसीएस या कंपन्यांची एवढ्या माेठ्या संख्येने परीक्षा घेण्याची क्षमता व अनुभव नाही. त्यांची क्षमता एकावेळी जास्तीत जास्त २० ते २५ हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची असल्याचे सांगितले जाते. याच अनुषंगाने लातूरच्या एका बेराेजगाराने परीक्षा लवकरात लवकर घ्यावी म्हणून नुकतेच मंत्री गिरीश महाजन यांना फाेनवरून साकडे घातले. आपण औरंगाबादमध्ये कशा अवस्थेत दिवस काढताे आहे, याबाबत आपली व्यथा मांडली. बहुतांश अर्जदारांची हीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा मंत्री महाजन यांनीसुद्धा उमेदवारांच्या संख्येपुढे सरकारची हतबलता बाेलून दाखविली. मात्र, लवकरच ही परीक्षा घेतली जाईल, असे आश्वासनही या उमेदवाराला दिले.

आठ जीआर अन् सीईओंवर भारया भरतीच्या अनुषंगाने आतापर्यंत राज्य शासनाने आठ जीआर काढले आहेत. अलीकडे तर शासनाने भरतीची ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर साेपविली हाेती. मात्र शासनाला जे शक्य नाही ते सीईओ कसे करणार, हा प्रश्न आहे. याच कारणावरून अनेक सीईओंची मंत्रालयातील संबंधित उपसचिवांवर नाराजी असल्याचेही सांगितले जाते. या भरतीसाठी धाेरणात्मक निर्णयाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.

२५ काेटी परत देणार कसे ?जिल्हा परिषद नाेकरभरतीच्या अनुषंगाने सुशिक्षित बेराेजगारांनी अर्जासाेबत शुल्क भरले. त्यापाेटी शासनाकडे सुमारे २५ काेटींची रक्कम जमा आहे. मात्र, ही रक्कम उमेदवारांना परत करायची कशी, हा प्रश्न आहे. कारण अनेकांनी सायबर कॅफेवरून फाॅर्म भरले. त्यामुळे ही रक्कम त्या कॅफेच्या खात्यात जाण्याचा धाेका आहे.

असा आहे नाेकरभरतीचा प्रवास२६ मार्च २०१९ : १३ ५२१ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध१४ जून २०२१: परीक्षेचे वेळापत्रक जाहीर१८ जून २०२१ : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रक रद्द२८ ऑगस्ट २०२१ : पुन्हा वेळापत्रक जाहीर२९ सप्टेंबर २०२१ : पुन्हा वेळापत्रक रद्द१० मे २०२२ : महाविकास आघाडीने पुन्हा वेळापत्रक जाहीर केले२६ ऑगस्ट २०२२ : शिदे-फडणवीस सरकारकडून पुन्हा वेळापत्रक जाहीर१९ सप्टेंबर २०२२ : पुन्हा परीक्षा रद्द३१ डिसेंबर २०२२ : आरक्षणानुसार बिंदू नामावली निश्चित करणे

२०१९ भरतीतील शुल्कखुला प्रवर्ग : ५०० रुपयेराखीव प्रवर्ग : २५० रुपयेएकूण जमा शुल्क : २५ काेटी ८७ हजारएकूण अर्ज : १२ लाख ७२ हजार

टॅग्स :NandedनांदेडState Governmentराज्य सरकारjobनोकरी