शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'मी विष पिले, शेतात हाय...'; मुलाच्या फोननंतर आईने हंबरडा फोडत शेताकडे घेतली धाव

By श्रीनिवास भोसले | Published: April 20, 2023 6:55 PM

आईने हंबरडा फोडत शेताकडे धाव घेतली; एकतर्फी प्रेम की कर्ज, कारण कळेना?

हदगाव (जि. नांदेड) : आई मी विष पिले असून थोड्या वेळात मरणार आहे... असे मोबाइलवर आईला सांगून  एकुलत्या एक मुलाने शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन केले. उपचारादरम्यान, १९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काशीनाथ पांडुरंग पवार (वय २१) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत्यूचे कारण कळाले नाही. मात्र एकतर्फी प्रेम प्रकरणातून  त्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली.

हदगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबाळा येथील काशिनाथ पांडुरंग पवार या तरुणाने १७ एप्रिल रोजी  स्वतःच्या शेतामधील आखाड्यावर  कीटकनाशक प्राशन केले. उपचारासाठी त्याला हदगाव  व नंतर नांदेड येथे दाखल केले.  आई, वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.  मात्र  १९ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास  त्याचा  मृत्यू झाला. मनाने अतिशय चांगला व सुसंस्कृत असलेला काशीनाथ हा अनेक दिवसापासून वाकोडे यांच्या ट्रॅक्टरच्या एजन्सीवर काम करीत होता.  नेमकी आत्महत्या कशासाठी केली, हे कोणी सांगायला तयार नाही.  मात्र काहींनी   एका मुलीशी झालेल्या एकतर्फी प्रेम प्रकरणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे  सांगितले.  काशीनाथचे दहाव्या वर्गापर्यंत पंचशील शाळेमध्ये शिक्षण झाल्याचे गावकऱ्यांनी  सांगितले. येथेच त्याचे प्रेम प्रकरण चालू झाले, अशी माहिती मिळाली.  

आईने हंबरडा फोडत शेताकडे धाव घेतलीकीटकनाशक प्राशन करण्यापूर्वी  काशीनाथने स्वतः आईला फोन करून सांगितले,  आई मी थोड्या वेळाने मरणार आहे.  मी वीष प्राशन केले आहे.  मी शेतामध्ये आहे... असे ऐकताच आईने हंबरडा फोडत  शेताकडे धाव घेतली.   अर्ध्या अर्ध्या संपलेल्या बॉटल  एकत्र करून ठेवलेले विष त्याने प्राशन केले.  दरम्यान, शेतीवर उपजीविका भागू शकत नाही. त्यामुळे स्वतः हदगावमध्ये एका ट्रॅक्टर कंपनीच्या  एजन्सीवर काम सुरू केले. सात एकर शेती असून नावालाच होती.  कारण शेतीवरचे कर्ज  फिटत नव्हते. त्यामुळे सुद्धा त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असेही बोलले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी