नांदेड- मी जातीय द्वेषभावनेतून काही केले नाही, अशाप्रकारे गुन्हा दाखल होणे दुर्दैवी बाब आहे. मी माणसाला कधी जात विचारत नाही, मी जामीन घेणार नाही, न्यायालय जी शिक्षा देईल ते मान्य आहे, अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अधिष्ठाताना टॉयलेटची साफसफाई खासदार हेमंत पाटील यांनी करायला लावली होती. या प्रकरणी त्यांच्यावर ॲ ट्रोसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. यावर हेमंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
रुग्णालयात अस्वच्छता होती. त्यांच्या सोबत मी देखील सफाई केली. पण जातीय राजकारणातून गुन्हा दाखल करण्यात आला. मी माझ्या आतापर्यंतच्या राजकिय आयुष्यात कधी ही कुणाला जात विचारली नाही, कुणालाही जातीवाचक बोललो नाही , अपमान केला नाहीं शिवीगाळ केली नाही, असं पाटील म्हणाले.
लोकप्रतिनिधीने लोकसेवकाला कर्तव्याची जाणीव करून द्यायची नाही का , रोज रुग्ण मरत पावत आहेत.मग त्यांचा सत्कार करायचा का असा सवाल ही त्यांनी केला. जाब विचारणे गुन्हा असेल तर मला मान्य आहे . मी जामीन घेणार नाही. न्यायालय जी शिक्षा देईल ते मला मान्य आहे अशी भूमिका पाटील यांनी मांडली.