ताबा सोडण्यास टाळाटाळ
हदगाव : तामसा येथील नाव्हा रोडवर बाजार समितीकडून पाचशे मे. टन शेतीमाल साठविण्याच्या हेतूने गोदामाची निर्मिती करण्यात आली होती. तेथील एका व्यापाऱ्याने गोदामावर अनधिकृत ताबा मिळवून खरेदी केलेल्या मालाची साठवण केली. बाजार समितीचे सचिव अविनाश जाधव यांनी सदरील गोदामातील माल जप्त करण्याची नोटीस बजावली. त्यालाही दोन दिवस झाले; पण व्यापाऱ्याने माल काढला नाही.
कुटुंबीयांना आर्थिक मदत
हदगाव : तालुक्यताील तळणी येथील शेतकरी नितीन दळवी यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता. ३० एप्रिल रोजी ही घटना घडली. खा. हेमंत पाटील यांनी ३ मे रोजी दळवी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मंडळ अधिकारी गिरी, तलाठी सरपे, उद्धव सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, पंजाब तावडे, राजेश तावडे, अशोक महाराज, गजानन दळवी उपस्थित होते.
पुलाचे भूमिपूजन
मुखेड : मुखेड व कंधार या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन आ. डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी लक्ष्मण पाटील, डॉ. वीरभद्र हिमगिरे, अशोक गजलवाड, किशोरसिंह चौव्हाण, सुधीर चव्हाण उपस्थित होते. कंधार तालुक्यात जाण्यासाठी यापूर्वी दोन पूल कार्यान्वित होते. मात्र, ते दोन्ही मार्ग मुखेडकरिता लांबचे ठरत असल्याने या नवीन पुलाची मान्यता देण्यात आली. भूमिपूजन कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.
गरजूंना धान्याचे कीट वाटप
किनवट : येथील साईबाबा संस्थान किनवटच्या वतीने गोरगरीब, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, आदी ठिकाणी थांबलेल्या लोकांना धान्याचे कीट वाटप करण्यात आले. १०१ गरजूंनी त्याचा फायदा घेतला. यापुढेही हे कार्य सुरू असेल, अशी माहिती पवार गुरुस्वामी यांनी दिली.
मका खरेदी केंद्र सुरू
किनवट : तालुक्यातील चिखली येथे मका खरेदी केंद्राचे उद्घाटन खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आ. भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार, शिवसेनेचे ज्योतिबा खराटे, तहसीलदार उत्तम कागणे, तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, मारोती दिवसे, गजानन बच्चेवार, मारोती सुंकलवाड, सूरज सातूरवार, संतोष यलचलवाड, आदी उपस्थित होते.
कोविड सेंटरला भेट
उमरी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी उमरी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. यावेळी तालुकाप्रमुख सुभाष पेरेवाड, बाबूराव भुते, विशाल अचकुलवाड, तहसीलदार माधव बोथीकर, डॉ. चव्हाण, दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार विष्णू घुगे, अनिल सोनकांबळे, साई खांडरे, रामराव जाधव, संतोष गंगासागरे, गजानन अलसटवार, आदी उपस्थित होते.
बिलोलीच्या दोघांना पदोन्नती
बिलोली : येथील चंद्रमनी सोनकांबळे व मारोती मुद्दमवाड यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नतीबद्दल पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक रामराव केंद्रे, वाडेकर, बोधणे, आदींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इतरांचीही उपस्थिती होती.
मोरे कुटुंबीयांचे सांत्वन
नांदेड : बाभूळगाव येथील माजी पं. स. सदस्य अशोक मोरे बाभूळगावकर यांच्या आई कान्हाबाई मोरे यांचे निधन झाले. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी ३ मे रोजी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी सिडकोचे भाजप अध्यक्ष गजानन देशमुख, माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पी. जी. बोडके सेवानिवृत्त
बिलोली : अटकळी येथील किशोर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक पी. जी. बोडके सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य संजय शेळगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून बळिराम पाटील, संभाजी पाटील, मुख्याध्यापक दबडे, कानोले, विभूते, उपसरपंच डोंगरे, प्रदीप जाधव, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उत्तम रुमाल यांनी केले.
वाईबाजार येथे रक्तदान शिबिर
माहूर : तालुक्यातील वाईबाजार येथे ६ मे रोजी शिवसेना, युवा सेना व प्रहार जनशक्ती पार्टीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन युवा सेनेचे यश खराटे व प्रहार जनशक्तीचे अमजद खान यांनी केले.
कोठारीत धूर फवारणी
किनवट : कोठारी सिंध गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांत फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात आली. याकामी सरपंच प्राजक्ता मेश्राम, उपसरपंच आम्रपाली कांबळे, सदस्य उद्धव आडे, श्याम जाधव, प्रभाकर मेश्राम, ग्रामसेवक प्रवीण रावळे यांनी रामजी नाईक तांडा, जमुना नगर, हिरापूर, आदी गावांत धूर फवारणी करण्याचा संकल्प केला.