बिलोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा
बिलोली : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास शासनाने मंजुरी दिली. याकामी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पाठपुरावा केला. महामानवाच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समाज मंदिर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी मैथिली कुलकर्णी यांनी ७१ हजारांची देणगी जाहीर केली. तर माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष मारोती पटाईत, माजी नगराध्यक्ष नागनाथ तुमोड, भीमराव जेठे, सेवानिवृत्त तलाठी माधव जाधव, नगरसेवक अरुण उपलवार, नितीन देशमुख, गायकवाड यांची उपस्थिती होती. बैठकीचे आयोजन नगरसेवक प्रकाश पोवाडे, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पोवाडे, गंगाधर सोनकांबळे यांनी केले होते.
काटकळंबा येथे जलदिन साजरा
कौठा : कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे जलप्रतिज्ञा घेऊन जलदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उद्धवराव बस्वदे, माधवराव बस्वदे, गोविंदअप्पा हंपले, साईनाथ कोळगीरे, व्यंकटराव लोहकरे, बालाजी बस्वदे, शिवराज स्वामी, माधवराव चोंडे, दिगंबर कांबळे, मोहन पवार, शेषराव चोंडे, संभाजी हंपले, माधव वाकोरे, गजानन कुठारे, गजानन कांबळे, मुजीब पठाण, रमेश झुलवाड, मनोज वाकोरे, उत्तम बसवदे, नामदेव झुलवाड, कोंडीबा जाधव, रामदास बस्वदे, गणपत गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन गणपत गायकवाड यांनी केले तर मोहन पवार यांनी आभार मानले.
गळफास घेऊन आत्महत्या
लोहा : तालुक्यातील सायाळ येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. नागनाथ खंडोजी निटोरे (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळाले नाही. लोहा पोलिसांनी शिवाणी निटोरे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.