शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

बळेगाव पाणीपुरवठा योजनेत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:40 AM

तालुक्यातील बळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेत १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्ष व सचिवांविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी: तालुक्यातील बळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेत १ कोटी ६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्ष व सचिवांविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेत सन २००६ ते २००९ या तीन वर्षांच्या कालावधीत आरोपींनी संगनमत करुन पाणीपुरवठा योजनेचे काम यशस्वी झाल्याचे कागदोपत्री दाखविले. योजनेचा खोटा अहवाल तयार करुन शासनाचे ३२ लाख २६० रुपये व ७४ लाख ४३३० रुपये असे एकूण १ कोटी ६ लाख ४ हजार ५९० रुपयांच्या निधीचा अपहार केला. संबंधितांनी याप्रकरणी जनतेचा विश्वासघात व फसवणूक केली, अशी तक्रार दत्तराव बापूजी गाढे (रा. बळेगाव) यांनी केली.या तक्रारीवरुन उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशावरुन उमरी पोलिसांत उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व पाणीपुरवठा समितीचे सचिव गणेश गाढे तसेच पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष धोंडिबा गाढे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शहदेव खेडकर हे तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे उमरी तालुक्यात खळबळ उडाली आहे़