बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:35 AM2019-01-12T00:35:20+5:302019-01-12T00:35:46+5:30

लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत.

Important thread in Booth Workers' Organization - Chavan | बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण

बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण

Next
ठळक मुद्देबूथ कमिटी कार्यकर्ता बैठक

नांदेड : लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे जनतेनेच दृढनिश्चय केला असून अब की बार काँग्रेस सरकार हे आता निश्चित झाल्याचे प्रतिपादन आ़अमिताताई चव्हाण यांनी केले़
शुक्रवारपासून आ. अमिता चव्हाण यांचा तीनदिवसीय देगलूर दौरा सुरू झाला आहे़ दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी देगलूर तालुक्यातील हणेगाव व मरखेल या दोन जिल्हा परिषद सर्कलमधील गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अमरनाथ राजूरकर हे होते तर व्यासपीठावर माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, सभापती माधवराव मिसाळे, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, न.प.अध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, शहराध्यक्ष शंकर कंतेवार, प्रवक्ते संतोष पांडागळे, प्रीतम देशमुख, प्रशांत देशमुख, अ‍ॅड.रामराव नाईक, बंदखडके, दीपक शहाणे, बालाजीराव टेकाळे, डॉ.विजयकुमार धुमाळे, उमेश पा.हाळीकर, संदीप पा.मरखेलकर, चंद्रकला रेड्डी, पप्पू रेड्डी, किशनराव पाटील, जनार्दन बिरादार, नंदाताई देशमुख आदींची उपस्थिती होती़
यावेळी आ़चव्हाण म्हणाल्या, बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा आहे. काँग्रेस पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होते. आता प्रत्येक बुथवर व्हॉट्सअप ग्रूप तयार करून त्या माध्यमातून गावातील प्रश्न जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत आहे. मोदी सरकारने पीकविमा किंवा कर्जमाफी असेल त्यासोबतच प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करणे असेल, ही सगळी खोटी आश्वासने दिली. त्यामुळेच आता जनताच त्यांना धडा शिकविल़

  • जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने अमिता चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, असा एकमुखी ठराव घेतला आहे;परंतु यासंदर्भातील निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे घेणार आहेत, त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, देगलूर तालुक्यातील सुजाण मतदारांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. समृद्धी महामार्गावर तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा अट्टाहास कशासाठी ? महामार्गाचे काम करणारे अधिकारी शेतकºयांच्या जमिनी घेऊन मालामाल झाले आहेत, असा आरोप आ. अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे़

Web Title: Important thread in Booth Workers' Organization - Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.