आ. हंबर्डे यांची भेट
नांदेड : बळीरामपूर येथील श्री संत रोहिदास मंदिर ट्रस्ट तीर्थक्षेत्राला आ.मोहनराव हंबर्डे यांनी भेट देऊन पूजा-अर्चा करून मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. यावेळी संस्थापक सचिव वामनराव विष्णुपुरीकर यांनी विकासकामाची माहिती दिली. यावेळी संभाजी पाटील, नागोराव आंबडवार, अशोक लाठकर, रघुनाथ वाघमारे, संभाजी मांजरमकर आदी उपस्थित होते.
देगलुरात आंदोलन
देगलूर : किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेड-हैद्राबाद राज्य महामार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड.मोहसीन अली, शिवसेनेचे महेश पाटील, प्रहारचे कैलास येजगे, संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील आदी उपस्थित होते.
हळदीकुंकू कार्यक्रम
कुंडलवाडी : येथील नगराध्यक्षा सुरेखा जिठावार यांच्या वतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुनीता चव्हाण, रत्नागिरे, टोंगे, दाचावार, देशपांडे, कुुलकर्णी, खेळगे, कांबळे, पोतनकर आदी उपस्थित होत्या.
मोकाट जनावरे
किनवट : गोकुंदा ग्रामपंचायत क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट गाढवांचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. पालिका व महसूल विभागाने गाढवांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शिवरकर यांचा सत्कार
मांडवी : येथील नूतन सपोनि. मल्हार शिवरकर यांचा कणकी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी, प्रशांत रेड्डी, पो.पा. गुरुनुले, अंबादास वाडगुटे, पवन चव्हाण, निशांत जाधव उपस्थित होते.
वृक्षरोपांची भेट
नायगाव : येथील नगरपंचायतीच्या वतीने ‘माझी वसुंदरा’ अभियानांतर्गत हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात वृक्षारोपणाची भेट देण्यात आली. माजी सभापती सुंदरताई चव्हाण, वंदना कदम, वंदना चव्हाण, विजयमाला चव्हाण, सुशिला बेळगे, चित्रा चव्हाण, रेणू चव्हाण, सोनिया चव्हाण आदी उपस्थित होत्या.
कलशारोहण सोहळा
भोकर : प्रभू विश्वकर्मा मंदिराचा कलशारोहण सोहळा १४ फेब्रुवारी रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होतील १४ रोजी काल्याचे कीर्तन होईल.
कार्यालयाची साफ-सफाई
भोकर : ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमांर्गत तहसील कार्यालयाची साफसफाई करण्यात आली. या कामी तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार, सर्व अव्वल कारकून, महसूल सहायक आदींनी आपापल्या कक्षाची साफसफाई केली.
हातणीला भेट
उमरी : भूसंपादन उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी हातणी येथील कैलास पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते.