शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 4:14 PM

बाहेर निवडणुकीची चर्चा पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणार कोण ?

नांदेड : दरवर्षी शेतकऱ्यांचा शेती माल हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली जाते. हमीभाव ठरवलाही जातो. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७९२ ते १३९२ रुपये प्रति क्विंटल कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने सरकारला शेतकऱ्याच्या गळ्यातील फास हटवायचा नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूक व दिवाळी सणाच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने गुरुवारी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. मागच्या काही वर्षांपासून शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात अडकला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करत शेतकरी शेती माल पिकविण्यासाठी धडपडतोय. सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणांचा गरज नसताना पाऊस पाडला जात आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे तसा भाव देण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसून येत नाही. हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रही उभारण्यात आले. मात्र एकाही हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता आला नाही. सध्या खर्च अधिक आणि उत्पादन कमी झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. अशी खंतही शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

हमीभाव केवळ नावालाचकेंद्र सरकारने सोयाबीनला यावर्षीच्या चालू खरीप हंगामासाठी ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. नांदेडच्याबाजार समितीत गुरुवारी ३९०० रुपये सरासरी दराने सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे हमी भाव केवळ नावालाच दिसून येत आहे.व्यंकटेश कदम, शेतकरी

एकही रूपया शिल्लक राहत नाहीशेतकऱ्याला ऐकरी सोयाबीनचा खर्च सरासरी अठरा ते वीस हजार रूपये ऐवढा येतो. अन् उत्पनही वीस हजार रूपयांच्या आसपास होत आहे. यामध्ये शेतकऱ्याने केलेल्या स्वता मेहनतीचा मोबदला पकडला तर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीतील उत्पन्नातून एक रूपयाही शिल्लक राहत नसल्याने चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.- विठ्ठल खांडरे, शेतकरी

शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हताशमागच्या काही वर्षापासून शेतकऱ्याच्या कोणत्याचा मालाल चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. मेहनतीच्या तुलने मोबदला मिळत नसल्याने निराश होवून कित्येक शेतकऱ्यांनी गळफास लावून मृत्यूला कवटाळले. त्यामुळे सरकारने वायफळ घोषणा राबविण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील.- आनंदराव शिंदे, शेतकरी

सोयाबीनचा सरासरी एकरी खर्चनांगरणी- १०००वखरणी-८००सोयाबीन बॅग- ३२००खत-१५००पेरणी- १०००तणनाशक- १५००औषध फवारणी- ४०००सोयाबीन काढणी- ३५००मळणी यंत्र- १५००माल वाहतूक- ५००एकुण खर्च- १८५००उत्पन्न- एकरी ५ क्विंटल, भाव- ३९००, एकुण उत्पन्न- १९५००

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार