जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा
नायगाव - शेतात जनावरे सोडून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी खैरगाव येथील तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला. २९ मार्चरोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी माधव भूजंग घंटेवाड यांनी फिर्याद नोंदवली.
कोरोना लसीकरणाला प्रतिसाद
अर्धापूर - तालुक्यातील लहान येथील नागरी रुग्णालय उपकेंद्रात शनिवारी कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी पं. स. सभापती कांताबाई सावंत, तालुका आरोग्य अधिकारी विद्या जिने, डॉ. यु. एम. इंगळे, एल. बी. रणखांब, अशोक सावंत आदी उपस्थित होते. लसीकरणासाठी डॉ. जी. आर.स्वामी, डॉ. गिरीश सीतावार, एस. एस. कल्याणकर, एल. एम. वाघमारे, पी. एस. दीपके, अश्विनी सावंत, सविता अंबेकर, वनिता अंबेकर, संगीता लोणे, राहुल खोकले, मधू महाराज आदींनी लसीसाठी परिश्रम घेतले.
लसीकरणाचा प्रारंभ
नरसीफाटा - प्राथमिक आरोग्य केंद्र, मांजरमअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र नरसी येथे लसीकरणाचा प्रारंभ जि. प. सदस्य माणिक लोहगावे यांच्याहस्ते झाले. यावेळी ग्रा. पं. सदस्य श्यामसुंदर कोकणे, संभाजी भिसे, कैलास तेलंग, प्रकाश तुपेकर, सतीश गौंड, गोविंद मांजरमे, नागनाथ सावकार, डॉ. शेख, विद्या बालन, जे. डी. राठोड आदी उपस्थित होते.
रुग्णांची हेळसांड
देगलूर - प्राथमिक आरोग्य केंद्र, हणेगाव येथे मागील अनेक वर्षांपासून औषध निर्माण अधिकारी तसेच इतर पदे रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. औषध निर्माण अधिकारी पद मागील चार वर्षांपासून रिक्त आहे. त्यांचे काम एन. एम. आणि जेएनएम करत आहेत.
मासिक बैठक रद्द
हदगाव - शेतकरी संघटनेची दर महिन्याच्या एक तारखेला होणारी मासिक बैठक कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकरी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे तसेच ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन पीकविमा मिळावा म्हणून पालकमंत्र्यांना निवेदन द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
पाच ब्रास वाळू द्यावी
हिमायतनगर - शासनाच्या घरकुल योजनेसाठी किमान ५ ब्रास वाळू द्यावी, अशी मागणी होत आहे. वाळूअभावी लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडून मागवून पाच ब्रास वाळूची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती नायब तहसीलदार तामसकर यांनी दिली.
जाधव यांची निवड
हिमायतनगर - तालुक्यातील पारवा खुर्द येथे सदानंद जाधव यांची आसाम निम लष्करी दलात जवान म्हणून निवड झाली. प्रशिक्षणासाठी सदानंद रवाना झाले आहेत. दरम्यान, छोटेखानी कार्यक्रमात सदानंद यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
गावठी हातभट्टीवर छापा
माहूर - माहूर तालुक्यातील हरडफ येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. सिंदखेडचे सपोनि भालचंद्र तिडके यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी ५०० रुपयांची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. पो. कॉ. हाफिजखान पठाण यांनी फिर्याद नाेंदवली. तपास सुरू आहे.
साईडपट्टया भराव्यात
नायगाव - तालुक्यातील अंचोली, गाेदमगाव, हिप्परगा, कृष्णूर, बरबडा, टाकळी त.ब. या २३ कि.मी. रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. एक महिन्यापूर्वी कृष्णूर येथील मस्जीद ते गंगातीर्थे यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करण्यात आला. मात्र साईडपट्टया भरण्यात न आल्याने वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. साईडपट्टया भरण्याची मागणी होत आहे.
जनावरांचा बाजार भरला
बिलोली - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बडूर मार्गावर जनावरांचा बाजार भरला. बाजारातील ७० टक्के लोकांनी मास्कचा वापर केला नाही. तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर नगरपालिकेचे पथक तेेथे पोहोचले. पथकाने जनावर मालकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी बराच वाद झाला.