नांदेड - शहरातील कविता रेस्टॉरंट परिसरात एका आयकर निरीक्षकाला अडवून त्याच्याजवळील दोन मोबाईल आणि पाच हजार रुपये हिसकावून घेण्यात आले. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पासेम हरिकृष्ण श्रीनिवासराव हे आयकर निरीक्षक मित्रासोबत (एपी २८ बीवाय २०३२) क्रमांकाच्या दुचाकीवरुन कविता रेस्टॉरंट परिसरातून जात होते. यावेळी मागाहून (एमएच २६, जे ८२६३) क्रमांकांच्या व एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन काहीजण आले. त्यांनी श्रीनिवासराव यांच्या दुचाकीला अडवले. त्यानंतर धमकावून त्यांच्याजवळील दोन मोबाईल आणि रोख पाच हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी श्रीनिवासराव यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.
आयकर निरीक्षकाला रस्त्यावर लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:50 AM