स्वाराती मराठावाडा विद्यापीठ,नांदेड मध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षी पदवी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या दरवर्षी पेक्षा आधिक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अपुऱ्या जागा असल्यामुळे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत, नसोसवायएफच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या म्हणजे एम.ए., एम.काँम., एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याची मागणी केली आहे. पण ह्या कडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत आहे. स्वा.रा.ति.मराठवाडा विद्यापीठाची स्थापना ही नांदेड,लातूर,परभणी,हिंगोली या अविकसित व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. विद्यापीठाचा केंद्र बिंदू विद्यार्थी आहे. आज हा केंद्र बिंदू उच्च शिक्षणा पासून वंचित राहत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताय विद्यापीठ उदासीन आहे. विद्यापीठ प्रशासन जर पदव्युत्तर अभ्यासक्रमा पासून या चार जिल्ह्यातील विद्यार्थी ना वंचित ठेवत असेल तर संघटनेला आंदोलना शिवाय पर्याय नाही. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षामधील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यींची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात आहे. २३ जानेवारी पासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा समोर अमरण उपोषण करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा.सतिश वागरे यांनी कळवली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जागा वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:20 AM