जिल्ह्यात कोरोनामुळे शनिवारी देगलूर येथील सिध्दार्थनगर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा नांदेडच्या जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६०५ जणांचा मृत्यू झाला, तर एकूण रुग्णांची संख्या २४ हजार ३०९ वर पोहोचली आहे. शनिवारी ९२ कोरोनाबाधितांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. त्यात मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ६१, विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ८, किनवट २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५ आणि खासगी रुग्णालयातून १५ रुग्ण घरी पाठविले आहेत.
जिल्ह्यात आजघडीला ७८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील २३ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ६१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारतीत ४७, किनवट कोविड रुग्णालयात ३४, मुखेड ९, हदगाव ३, महसूल कोविड केअर सेंटर ५९, देगलूर ५ आणि खासगी रूग्णालयातील ८९ रूग्णांचा समावेश आहे, तर गृहविलगीकरणात मनपाअंतर्गत २८२, तर जिल्हाभरातील तालुकांतर्गत रुग्णांची संख्या १४७ इतकी आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३९ टक्क्यांवर पोहोचले आहे.