भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन
नांदेड, उत्पादित मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव अर्थात एमएसपी मिळावा या मागणीसाठी भारतीय किसान संघाने ८ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीसमोरील आंदोलन केले. या आंदोलनास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
देशभरातील शेतकऱ्यांना न्याय मिळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी भारतीय किसान संघाच्यावतीने एमएसपीची मागणी लावून धरण्यात आली आहे. हा कायदा लागू झाल्यास शेतकऱ्यांचा फायदा हाेईल. परंतु आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही. मोदी सरकारने याकडे लक्ष द्यावे या हेतूने भारतीय किसान संघाने ८ सप्टेंबर रोजी देशभर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत प्रत्येक जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन केले. याचाच भाग म्हणून नांदेडातही आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भारतीय किसान संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.व्यंकट माने, जिल्हाध्यक्ष रमेशराव कुंभारे,उपाध्यक्ष प्रा.डॉ. संजय पाटील, हावगीराव गोपछडे, सहमंत्री,नरेंद्र जोशी, मारोती तुपकर, कोषाध्यक्ष,नारायण सादुलवार, श्याम दारमोड, व्यंकटराव भरडे, मधुकर पाये, सुधाकरराव कदम, शेषराव पा. कदम, केदार शिंदे, साईनाथ कोदळे, लक्ष्मण जगदंबे, पांडुरंग बुध्देवाड, नीळकंठ मायमावले, गंगाधर अंकमवार, सुनील कल्याण, प्रकाश वच्छेवार, गंगाधरराव हनमानगे, चंद्रकांत चक्रवार, नीलेश डांगे, श्याम महाराज, राजाभाऊ पार्डीकर आदींचा सहभाग होता.