सोयाबीनचे उत्पन्न कमी झाले तरी शेतकऱ्यांनी हार न मानता तूर पिकातून चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर तूर पिकाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले नाना प्रकारची महागडी कीटकनाशक औषधांची पिकावर फवारणी केली यामुळे तुरीचे पीक जोमात आले भरपूर फुलं ; कळ्या ; शेंगा मोठ्या प्रमाणावर लागले यामुळे शेतकरी सोयाबीनच्या उत्पन्नाची कमतरता तूर पिकातून निघेल अशी शाश्वती शेतकऱ्यांना होती . परंतु तूर पीक ऐण भरात असतांना पिकाला अज्ञात रोगाची लागण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे . रोजच्या रोज तुरीचे पीक अधिकच वाळून जात आहे . कितीही महागडी औषधी फवारली तरी हा रोग आटोक्यात येत नसल्याने तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती वाटत आहे . या रोगाबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे .
तूर पिकावर अज्ञात रोगाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:15 AM