शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

निरीक्षकास मारहाण प्रकरण थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:38 AM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारातील वाहतूक निरीक्षक सुमेध निकाळजे यांना सोमवारी काही वाहकांनी संगनमत करून मारहाण केली़

ठळक मुद्देपरस्परविरोधी तक्रारी : नांदेड आगारातील घटना

नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारातील वाहतूक निरीक्षक सुमेध निकाळजे यांना सोमवारी काही वाहकांनी संगनमत करून मारहाण केली़ या घटनेला चोवीस तास उलटूनही कोणावरही कारवाई करण्यात आली नाही़ त्यामुळे सदर प्रकरण दडपले की काय? अशी चर्चा नांदेड आगारात मंगळवारी ऐकायला मिळाली़महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून नांदेड आगाराची ओळख आहे़ परंतु, मध्यवर्ती बसस्थानक आणि आगारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ सोमवारी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक निरीक्षक सुमेश निकाळजे यांना कर्तव्यावर नसलेल्या पाच वाहकांनी संगनमत करून मारहाण केल्याची तक्रार आहे़ या घटनेसंदर्भात मारहाण झालेल्या वाहतूक निरीक्षक सुमेध निकाळजे यांनी पाच वाहकांविरोधात वजिराबाद ठाण्यात मारहाण आणि शिवीगाळप्रकरणी तक्रार दिली आहे़ परंतु, तक्रारीच्या चोवीस तासानंतरही कोणावरही गुन्हा नोंदविण्यात आला नाही़ तर स्थानिक एसटी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नसल्याची बाब पुढे आली आहे़या प्रकरणात महामंडळात कार्यरत असलेल्या एसटी कामगार संघटना आणि एसटी कामगार सेनेने प्रतिष्ठेचा विषय बनविल्याची चर्चादेखील आगारात ऐकायला मिळत आहे़ परंतु, कर्तव्यावर असताना एखाद्या अधिकाऱ्यास मारहाण झाल्यानंतर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसेल तर अशा घटना वारंवार घडतील, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़दरम्यान, याप्रकरणी नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात आगारप्रमुख आणि सुरक्षा अधिकारी हे संबंधित कर्मचा-यांचे जबाब घेत आहेत़ मारहाण प्रकरणाची सत्यता पडताळून दोषींवर निश्चिपणे कारवाई होईल़ आगारप्रमुख आणि सुरक्षा अधिकारी यांच्या पातळीवर कारवाई होईल, असे विभाग नियंत्रक अविनाश कचरे यांनी सांगितले़

  • कर्तव्यावर असताना मारहाण होवूनदेखील प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही़ तर तक्रार करूनही ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत नाही, ही बाब गंभीर असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव एम़ बी़ बोर्डे यांनी केला आहे़
टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी